ऑक्सिजन निर्मितीसह साठवणुकीस प्राधान्य

पालकमंत्री मुश्रीफ : करोना परिस्थिती आणि उपाययोजनांचा घेतला आढावा
ऑक्सिजन निर्मितीसह साठवणुकीस प्राधान्य

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

करोनाच्या संभाव्य तिसर्‍या लाटेचा (Probably the third wave of Corona) सामना करण्याच्या अनुषंगाने आरोग्यविषयक सुविधांच्या ( Health facilities) बळकटीकरणासोबतच पुरेशा ऑक्सिजन निर्मितीला प्राधान्य देण्यात आले आहे (Oxygen production is preferred). जिल्ह्यातील ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांची वेळेत उभारणी करणे आणि पुरेशी साठवणूक क्षमता (Adequate storage capacity) यास प्राधान्य असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री हसन मुश्रीफ (Guardian Minister Hassan Mushrif) यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात (Collector Office) पालकमंत्री मुश्रीफ (Guardian Minister Hassan Mushrif) यांनी बुधवारी करोना परिस्थिती आणि उपाययोजनांचा आढावा घेतला. (A review of the Corona situation and measures) जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्री घुले (Zilla Parishad President Rajshree Ghule), आ. संग्राम जगताप (MLA Sangram Jagtap), जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले (Collector Rajendra Bhosale), जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर (ZP CEO Rajendra Kshirsagar), जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील (SP Manoj Patil), महानगरपालिकेचे आयुक्त शंकर गोरे (Municipal Commissioner Shankar Gore), निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित (Resident Deputy Collector Sandeep Nichit), उपजिल्हाधिकारी उदय किसवे, उर्मिला पाटील, रोहिणी नर्‍हे, जयश्री आव्हाड, उज्ज्वला गाडेकर, जिल्हा नियोजन अधिकारी निलेश भदाणे, अन्न व औषध प्रशासन उपायुक्त अशोक राठोड यांची यावेळी उपस्थिती होती.

पालकमंत्री मुश्रीफ यांनी, जिल्ह्यातील सध्याची करोनाची परिस्थिती(CoVid 19 situation), लसीकरणाची सद्यस्थिती (Current status of vaccination), कोणत्या भागात रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण जास्त आहे. म्युकरमायकोसिसच्या रुग्णांची संख्या (patients with mucormycosis), त्यासाठीचा उपलब्ध औषधसाठा(Available drug stocks), संभाव्य तिसर्‍या लाटेच्या अनुषंगाने प्रशासनाने केलेली तयारी (Preparations by administration) आदींचा आढावा घेतला. जिल्ह्यात सध्या करोनाची रुग्णसंख्या घटत असल्याचे चित्र आहे. दुसरी लाट ओसरत चालली असली तरी ग्रामीण भागात काही ठिकाणी रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

अधिकाधिक आरटीपीसीआर चाचण्या (RTPCR Testing) घेणे आणि बाधितांना शोधून संपर्क साखळी तोडणे महत्त्वाचे आहे. मे महिन्यांच्या दुसर्‍या आठवड्यापासून जिल्ह्यातील बाधित रुग्णांचा पॉझिटीव्हीटी रेट (Positive Rate) कमी कमी होत आहे. जून महिन्याच्या अखेरीस हा दर केवळ 3.37 टक्के इतका खाली आला आहे. नागरिकांनी काळजी घेतली तर आपण करोनाला रोखू शकतो, असे त्यांनी नमूद केले. जिल्ह्यात 9 लाख 95 हजार 589 व्यक्तींनी लसीची मात्रा घेतल्याची माहिती त्यांनी दिली.

आतापर्यंत जिल्ह्यासाठी कोविशिल्डचे (Covishield) 8 लाख 19 हजार 270 आणि कोवॅक्सिनचे (co-vaccine) 1 लाख 90 हजार 260 असे एकूण 10 लाख 9 हजार 530 डोस प्राप्त झाल्याचे त्यांनी सांगितले. येथील जिल्हा रुग्णालयातील (District Hospital) लॉन्ड्रीचा शुभारंभ पालकमंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आला. जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून याठिकाणी ही व्यवस्था करण्यात आली आहे. ती आजपासून कार्यान्वित करण्यात आली.

पेरणीचाही विषय

पालकमंत्री मुश्रीफ यांनी कृषी यंत्रणेकडून जिल्ह्यातील पावसाची आकडेवारी, पेरणी झालेले क्षेत्र, पावसाने उघडीप दिल्याने जिल्ह्यातील पेरणी क्षेत्रावर होणारा परिणाम याचा सविस्तर आढावा घेतला. जिल्ह्यातील शेतकर्‍यांना दुबार पेरणीची वेळ येणार नाही आणि पुरेसा पाऊस पडेल, अशी आशा करुया, असे त्यांनी सांगितले. पाऊस आठवडाभर लांबला तर मूग आणि उडीदाची दुबार पेरणीचे संकट ओढवू शकते. मात्र, पाऊस वेळेवर येईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com