प्रवरा परिसरात साथीच्या रुग्णांमध्ये वाढ

प्रवरा परिसरात साथीच्या रुग्णांमध्ये वाढ

राजुरी |वार्ताहर| Rajuri

प्रवरा परिसरात चिकन गुनिया, डेंग्यू, गोचीड तापाच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र दिसू लागले असून ग्रामीण भागातील दवाखान्यांमध्ये रुग्णांची गर्दी दिसू लागली आहे.

करोनाच्या महामारीनंतर थोड्या प्रमाणात का होईना व्यवहार सुरळीत सुरू होत असताना पुन्हा अनेक गावांमध्ये डेंग्यू, गोचीड ताप, चिकनगुनिया यासारखे आजार होत असल्यामुळे सर्वसामान्य नागरिक आता हतबल झाले असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. दवाखान्यात गेल्यानंतर प्रथम उपचारानंतर रुग्णांना गोळ्या औषधे दिल्यानंतर बरे लागले तर ठीक नाही तर रुग्णांना रक्त लघवी चेक केल्याशिवाय पर्याय राहत नाही.

त्यामुळे सर्वसामान्य रोजंदारीवर जाणार्‍या नागरिकांना याची मोठी झळ सोसावी लागते. अशा आजारांपासून मुक्तता मिळण्यासाठी स्थानिक प्रशासनाने लक्ष देऊन गावात स्वच्छता अभियान राबवणे सध्या गरजेचे झाले आहे.

सध्या ग्रामीण भागामध्ये करोनाचे संकट काहीसे संपण्याच्या मार्गावर असताना साथीच्या आजाराने दवाखान्यांमध्ये रुग्णांची गर्दी दिसू लागली असल्याचे चित्र दिसत आहे. यामध्ये हात पाय दुखणे, डोके दुखणे, सर्दी येणे, उलट्या होणे, पोट दुखणे आदी लक्षणे दिसू लागले असल्यामुळे ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. नागरिकांनी पाणी उकळून प्यावे, आपल्या घराच्या आजूबाजूला घाण कचरा होऊ देऊ नये, तणनाशक फवारणी करून घ्यावी. आपल्या कुटुंबाची काळजी आपण स्वतः घ्यावी.

- डॉ. सोमनाथ गोरे, राजुरी

Related Stories

No stories found.