वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील एकाचा मृत्यू

गुन्हा दाखल
वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील एकाचा मृत्यू

नेवासा |तालुका वार्ताहर| Newasa

अहमदनगर ते संभाजीनगर रोडने (Ahmednagar To Sambhajinagar Road) संभाजीनगरकडे जात असलेल्या मोटारसायकलस्वारास चारचाकी वाहनाने धडक (Car And Bike Accident) दिल्याने मोटारसायकलस्वाराचा मृत्यू (Death) झाल्याची घटना घडली असून याबाबत दाखल फिर्यादीवरुन वाहनचालकावर अपघात (Accident) करुन मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल (Filed a Case) करण्यात आला आहे.

वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील एकाचा मृत्यू
‘कमळा’च्या उपरण्याने केली मा.आ.कांबळे यांची गोची

याबाबत शैलेश सीताराम ठोंबरे (वय 32 धंदा-व्यवसाय रा. सिडको, संभाजीनगर) यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, प्रवरासंगम (Pravarasangam) येथील हॉटेल मातोश्री समोर प्रवरासंगम ता नेवासा येथे माझे वडील नामे सीताराम आसाराम मटोबरे (वय 63) हे प्रवरासंगम (Pravarasangam) येथून घरी येत असताना पाठीमागून येणार्‍या चारचाकी गाडीच्या (एमएच 23 बीसी 8591) अज्ञात चालकाने त्याचेकडील गाडी रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष (Ignore) करून भरधाव वेगात चालवून माझे वडील याचे कडील दुचाकीस (एमएच 20 ईक्यू 1608) हीस पाठीमागून जोराची धडक देवून त्याचे कमी अधिक दुखापतीस तसेच त्याचे मरणास कारणीभूत झाला असून त्याचेकडील दुचाकीस नुकसान केले आहे तसेच अपघातात (Accident) त्यांना कोणत्याही प्रकारची मदत न करता व अपघाताची खबर न देता पळून गेला.

या फिर्यादीवरुन नेवासा पोलीस ठाण्यात (Newasa Police Station) चारचाकीच्या चालकावर गुन्हा रजिस्टर नं. 798/2023 भारतीय दंड विधान कलम 304(अ), 279, 337, 338, 427 सह मोटारवाहन कायदा कलम 184, 134(अ) (ब)/177 प्रमाणे गुन्हा दाखल (Filed a Case) करण्यात आला आहे.

वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील एकाचा मृत्यू
मुळात किती आहे पाणीसाठा ? वाचा...
वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील एकाचा मृत्यू
गोदावरीतील विसर्ग 1714 क्युसेकवर
वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील एकाचा मृत्यू
नगरमधील माजी सैनिकाचा भोसकून खून; मृतदेह फेकला लोणी हद्दीत
   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com