प्रवरासंगमच्या नदीपात्रात आढळला देहरेच्या व्यक्तीचा मृतदेह

प्रवरासंगमच्या नदीपात्रात आढळला देहरेच्या व्यक्तीचा मृतदेह

नेवासा |तालुका वार्ताहर| Newasa

नेवासा तालुक्यातील (Newasa Taluka) प्रवरासंगम (Pravara Sangam) येथील नदीपात्रात सिद्धेश्वर मंदिरालगत नगर तालुक्यातील व्यक्तीचा मृतदेह (Dead Body) तरंगताना मिळून आला असून याबाबत नेवासा पोलीस ठाण्यात (Newasa Police Station) अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकार्‍यांनी नेवासा पोलिसांना (Newasa Police) दिलेल्या खबरीत म्हटले की, रेवणनाथ शालीग्राम धनवटे (वय 40) रा. देहरे ता. जि. अहमदनगर यास 10 डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजता उपचारासाठी दाखल केले होते. तो त्यापूर्वी मयत झालेला होता. या खबरीवरुन नेवासा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास पोलीस नाईक संजय माने करत आहेत.

दरम्यान सदर व्यक्तीचा डबर उत्खननाचा ट्रॅक्टर राहुरीच्या महसूल विभागाने (Department of Revenue) जप्त (Seized) केला असल्याचे समजते. त्यातूनच त्याने आत्महत्या (Suicide) केली असावी असा अंदाज व्यक्त होत असून मयताच्या नातेवाईकांनी याबाबत आरोप केला आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com