प्रवरा नदीपात्रात पोहोण्यासाठी गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू

या तालुक्यातील घटना
प्रवरा नदीपात्रात पोहोण्यासाठी गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू

बेलापुर |वार्ताहर| Belapur

प्रवरा नदीपात्रात (Pravara River) पोहोण्यास (Swim) गेलेल्या युवकाचा नदीत बुडून मृत्यू (River Drowning Death) झाला असुन दोन दिवसांपासुन शोध मोहीम सुरु होती. आज सकाळी त्याचा मृतदेह (Dead Body) सापडला.

प्रवरा नदीपात्रात पोहोण्यासाठी गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू
कुकडीचे पाणी पेटले; राष्ट्रवादी नेत्याची हातात दगड घेऊन नगरचे नेते आणि कुकडीच्या अधिकार्‍यांना तंबी

बेलापुर (Belapur) रामगड येथील जावेद इर्शादअली सय्यद (वय 40 रा. बेलापुर खु.) हा प्रवरा तिरावर गाडी धुण्याकरीता आला होता. गाडी धुतल्यानंतर त्याला प्रवरानदी (Pravara River) पात्रात पोहोण्याचा मोह आवरता आला नाही. तो बेलापुर (Belapur) खूर्दच्या नावघाटावरुन पोहोत प्रवरा नदीच्या मध्यावर आला. परंतु त्याचा दम तुटल्यामुळे तो नदीत बुडाला.

प्रवरा नदीपात्रात पोहोण्यासाठी गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू
यंदा पाऊस कमीच !

बर्‍याच वेळाने हा युवक (Youth) बुडाल्याचे लक्षात आले. लगेच शोध मोहीम सुरु करण्यात आली. रात्र झाल्यामुळे शोधमोहीम थांबविण्यात आली. सकाळी पुन्हा शोध मोहीम सुरु करण्यात आली. गावातील पट्टीचे पोहणारे तसेच अग्नीशामक दलाचे अधिकारी हेमंत कारले हे सात जणांच्या टिमसह तेथे पोहोचले. श्रीरामपुरचे (Shrirampur) तहसीलदार राजेंद्र वाकचौरे, मंडलाधिकारी सारिका वांडेकर, बेलापुर खूर्दचे कामगार तलाठी शिंदे, बेलापुर पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी ठाण मांडून होते.

प्रवरा नदीपात्रात पोहोण्यासाठी गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू
प्रेम व्यक्त करत चाकूने हल्ला

गावातील पोहणारे तसेच अग्नीशामक दलाचे जवान यांच्या अथक प्रयत्नानंतर सकाळी अकरा वाजता त्याचा मृतदेह प्रवरा नदीत (Pravara River) सापडला. त्याचे शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.

प्रवरा नदीपात्रात पोहोण्यासाठी गेलेल्या युवकाचा बुडून मृत्यू
शिर्डीतील 6 हॉटेल छापा प्रकरणी 4 मालकावर पिटा अंतर्गत कारवाई
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com