
आंबी |वार्ताहर| Ambi
राहुरी तालुक्यातील प्रवरा नदी काठावरील गावातील ग्रामस्थांनी वाळू लिलावास तीव्र विरोध केला आहे. नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत या विषयावर चर्चा करताना प्रांताधिकारी, तहसीलदार तसेच अधिकार्यांच्या समोर ग्रामस्थांनी विरोध दर्शविला.
प्रवरा काठावरील आंबी, अंमळनेर, केसापूर, चिंचोली, पिंपळगाव, फुणगी गंगापूर या गावांत शासनाने श्रीरामपूरचे प्रांताधिकारी अनिल पवार व राहुरीचे तहसीलदार फसियोद्दीन शेख, देवळालीप्रवरा मंडल अधिकारी बाळकृष्ण जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित केलेल्या वाळूलिलाव ग्रामसभा शांततेत झाल्या. मात्र प्रत्येक गावच्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी वाळू लिलावाला कडाडून विरोध केला.
यावेळी आंबीच्या सरपंच सौ. संगीता साळुंके, उपसरपंच विजय डुकरे, अंमळनेरच्या सरपंच सौ. अरुणा जाधव, उपसरपंच किरण कोळसे, केसापूरचे सरपंच बाबासाहेब पवार, उपसरपंच अनिल भगत, पिंपळगाव फुणगीचे सरपंच रामभाऊ वडितके, गंगापूरचे सरपंच सतीश खांडके, उपसरपंच गणेश काळे, आंबीच्या पोलीस पाटील सुरेखा लोंढे, चिंचोलीचे उपसरपंच विलास लाटे, माजी संचालक शिवाजीराव कोळसे, चेअरमन भागवतराव कोळसे, रावसाहेब सालबंदे, कोंडीराम साळुंके, कामगार तलाठी नितीन अहिरे, माजी सरपंच रोहन जाधव, हरिश्चंद्र साळुंके, सुनील लोंढे, शिवाजी सालबंदे, सदस्य नंदकुमार जाधव, भीमभाऊ कोळसे, सुभाष डुकरे, गणेश कोळसे, संदीप साळुंके, अध्यक्ष शिवाजी जाधव, एकनाथ नान्नोर, दादा मेहेत्रे, ग्रामसेवक प्रभाकर चव्हाण, पत्रकार विश्वनाथ जाधव, जालिंदर रोडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी अंमळनेर ग्रामपंचायतीच्यावतीने अनिल पवार, तहसीलदार शेख यांचा सत्कार करण्यात आला.