महाराष्ट्र पोलीस
महाराष्ट्र पोलीस
सार्वमत

प्रवरानगर व गोगलगावात करोनाबाधित आढळले

Arvind Arkhade

लोणी|वार्ताहर|Loni

राहाता तालुक्यातील लोणी खुर्द गावाच्या प्रवरानगर भागात व गोगलगाव येथे शुक्रवारी एक-एक करोना बाधित रुग्ण आढळले. त्यांच्या संपर्कातील 17 जणांचे स्राव तपासणीसाठी घेण्यात आले.

लोणी बुद्रुक गावात 5 व खुर्द गावात 1 करोना बाधित रुग्ण सध्या आहे. त्यांच्या संपर्कातील बहुतांशी व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत. तरीही चंद्रापूरचे 2 आणि लोणीतील 3 व्यक्तींचे अहवाल अजून प्राप्त झालेले नाहीत. त्यातच शुक्रवारी प्रवरा रुग्णालयात नोकरीस असलेला प्रवरानगर येथील एक व्यक्ती करोना बाधित आढळून आल्याने त्याच्या संपर्कातील 12 जणांच्या घशातील स्राव आरोग्य यंत्रणेने तपासणीसाठी घेतले आहेत.

प्रवरानगर हा भाग लोणी खुर्द गावाच्या हद्दीत येत असल्याने काही दिवसांपूर्वी गावातील समर्थ कॉलनीत राहणारा पोलीस कर्मचारी बाधित आढळल्याने प्रशासन अलर्ट मोडवर असताना दुसरा रुग्ण आढळून आल्याने अधिक सतर्कता बाळगली जात आहे. गावातील एका व्यक्तीचा मृत्यू झाला मात्र त्याचा अहवाल निगेटिव्ह आल्याने लोणीकरांना दिलासा मिळाला.

लोणी जवळच्या गोगलगावमध्ये अद्याप एकही रुग्ण आढळला नव्हता. मात्र शुक्रवारी या गावाच्या हद्दीत संगमनेर रस्त्यालगत बाबा हॉटेलजवळ राहणारा एक व्यक्ती करोना बाधित आढळून आला. ही व्यक्ती त्रास जाणवू लागल्याने संगमनेर येथे उपचारासाठी दाखल झाली होती. मात्र त्यांच्या घशातील स्राव घेतल्यानंतर काल बाधित आढळून आली.

गोगलगावपासून या व्यक्तीचे घर एका बाजूला असून गावाशी त्याचा अजिबात संपर्क नसल्याने सध्यातरी गोगलगावकर चिंतामुक्त आहेत. या व्यक्तीच्या संपर्कातील 5 जणांच्या घशातील स्राव तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. सध्या 22 व्यक्तींच्या अहवालांची प्रतीक्षा असल्याची माहिती आरोग्य यंत्रणेने दिली.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com