तरुणाचा प्रवरा डावा कालव्यात पडून मृत्यू

राजुरी येथे गुरुवारी दुपारी एक वाजेची घटना
तरुणाचा प्रवरा डावा कालव्यात पडून मृत्यू

राजुरी |वार्ताहर| Rajuri

प्रवरा डाव्या कालव्यात पडून सुनील सिताराम पंडित या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची घटना राहाता तालुक्यातील राजुरी येथे गुरुवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली.

राजुरी येथे प्रवरा डावा कॅनॉल जवळपास राहत असणार्‍या सुनिल सिताराम पंडित (वय 37) हे दुपारी साडेबारा ते एकच्या दरम्यान कालव्याकडे गेले होते. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे ते अचानक पाण्याच्या खाली गेले. यानंतर तेथे आजूबाजूला धुणे धुण्यासाठी असणार्‍या महिलांच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी आरडाओरडा केल्यामुळे युवकांनी प्रवरा कालव्याकडे धाव घेऊन या इसमाचा शोधाशोध सुरू केल्यानंतर त्यांचा दगडाला अडकलेला मृतदेह पाण्याबाहेर काढला. त्यांना प्रवरा हॉस्पिटलला नेण्यात आले परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही.

यावेळी मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यासाठी येथील युवक विशाल पंडित, सागर पवार, श्रीकांत राजगुरू, रोहन पंडित, अनिल पंडित, गणेश पारखे, विजय पवार यांच्यासह ग्रामस्थांनी मदत केली. घटनेची माहिती राजुरीचे पोलीस पाटील रावसाहेब गोरे यांनी लोणी पोलीस स्टेशनला दिली. पुढील तपास पोलीस करीत आहेत. राजुरी येथे अशीच दुर्दैवी घटना दोन महिन्यांपूर्वी चार मोर्‍या परिसरात घडली होती. त्यातही 18 वर्षाच्या युवकाचा मृत्यू झाला होता. पुन्हा प्रवरा डावा कालव्यामध्ये अशी दुर्दैवी घटना झाल्यामुळे राजुरी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com