प्रवरा कालव्यात आढळल्या सातशे देशी-विदेशी दारूच्या बाटल्या

प्रवरा कालव्यात आढळल्या सातशे देशी-विदेशी दारूच्या बाटल्या

खंडाळा |वार्ताहर| Khandala

श्रीरामपूर (Shrirampur) तालुक्यातील खंडाळा (Khandala) गावातून जाणाऱ्या प्रवरा कालव्यात सुमारे 500 ते 700 इंग्लिश दारू बाटल्या आढळून आल्या असून ही दारू बनावट (Alcohol) कि काय, कोणी व का टाकल्या हे समजू शकले नाही.

या दारूच्या बाटल्या काही नागरिकांच्या निदर्शनास आल्याने खंडाळा (Khandala) येथील ग्रामपंचायत सदस्य संदीप विघावे यांना कळविले असता टिळकनगर पोलीस चौकीचे (Tiknagar Police station) पोलीस कर्मचारी यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन सर्व दारू बॉटल ताब्यात घेऊन त्यातील दोन बॉटल लॅब टेस्टिंग साठी पाठविल्या.

मात्र प्रवरा कालव्यात टाकलेल्या इंग्लिश दारू बॉटल बनावट कि अन्य काही कारण, तसेच या दारू बॉटल कोणी व का टाकल्या हे समजू शकले नाही.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com