प्रवरा उजवा कालव्याचे आवर्तन बंद केल्याने शेतकरी संतप्त

मंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली- शिरसाठ
File Photo
File Photo

राहुरी |प्रतिनिधी| Rahuri

प्रवरा (Pravara) पट्ट्यात भंडारदरा धरणाच्या (Bhandardara Dam) लाभक्षेत्रात पावसाने दडी मारल्याने शेतकर्‍यांना खरीप पिकांसाठी (Kharif Crops) पाण्याची गरज भासू लागली आहे. मात्र, प्रवरा उजवा कालवा (Pravara right canal) पाटबंधारे अधिकार्‍यांच्या चुकीच्या नियोजनामुळे लवकरच बंद केल्यामुळे उजव्या कालव्यावरील शेकडो एकर उसाचे क्षेत्र (Sugar cane area) पाण्यापासून वंचित राहिले आहे. त्यामुळे ऊस जळून जाण्याची भीती शेतकर्‍यांनी व्यक्त केली आहे. तर सध्या उभी पाण्यावाचून पिके करपून गेली आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

दरम्यान, जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Water Resources Minister Jayant Patil) यांनी संबंधित अधिकार्‍यांना आदेश देऊनही त्यांच्या आदेशाला संबंधित आडमुठ्या अधिकार्‍यांनी केराची टोपली दाखविली असल्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल शिरसाठ (NCP Leder Anil Shirsath) यांनी केली आहे. पाटबंधारे खात्याचे उप अभियंता यांच्याशी संपर्क केला असता उजव्या कालव्यावरील पाण्याची मागणी संपली असल्याचे बेजबाबदारपणे उत्तर मिळत असल्याचे शिरसाठ यांनी सांगितले.

विशेष म्हणजे पाटबंधारे मंत्री जयंत पाटील यांचे भाचे राहुरी तालुक्याचे ना. प्राजक्त तनपुरे (Rahuri Minister Prajakt Tanpure) हे स्वतः मंत्री आहेत. त्यांच्याच तालुक्यात पाटबंधारे खात्याचे अधिकारी मंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवित आहेत अशी तक्रार शिरसाठ यांनी पाटबंधारे मंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com