प्रवरा रुग्णालयातील दोघे करोना बाधित

प्रवरा रुग्णालयातील दोघे करोना बाधित

लोणी|वार्ताहर|Loni

येथील प्रवरा रुग्णालयात सेवेत असलेले दोघे जण करोना बाधित आढळून आले असून त्यात लोणी खुर्द येथील परिचारिका व दाढ बुद्रुक येथील व्यक्तीचा समावेश आहे.

लोणी परिसरात करोनाचे रुग्ण कमी प्रमाणात आढळून येत आहेत. सोमवारी प्राप्त झालेल्या अहवालात प्रवरा रुग्णालयातील एक परिचारिका करोना बाधित आढळून आली. ती लोणी-पिंप्री निर्मळ रस्ता परिसरातील रहिवाशी असून जवळ लोकवस्ती नसल्याने त्या भागात प्रतिबंधात्मक क्षेत्र निर्माण करण्याची आवश्यकता भासली नाही.

दरम्यान या परिचारीकेच्या कुटुंबातील चार जणांच्या घशातील स्राव तपासणीसाठी घेण्यात आले. परीचारिकेचा पतीही याच रुग्णालयात नोकरीत असून त्यांचा अहवाल मात्र निगेटिव्ह आला आहे. दाढ बुद्रुक येथील रहिवाशी असलेली एक व्यक्ती प्रवरा रुग्णालयात नोकरीस असून ती सोमवारी बाधित आढळून आली. या व्यक्तीच्या कुटुंबातील पाच जणांच्या घशातील स्राव आरोग्य यंत्रणेने तपासणीसाठी घेतले.

दरम्यान लोणीतील रहिवाशी असलेली व प्रभात डेअरीत नोकरीत असलेल्या व्यक्तीचा अहवाल निगेटिव्ह आला. प्रवरानगर, चंद्रापूर आणि गोगलगाव येथील 21 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आल्याने प्रशासन व नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. लोणी बुद्रुक येथील सोनार गल्लीतील तीन बाधित व्यक्तींपैकी दोन जण करोनावर मात करून घरी आहेत.

तिसरा रुग्णही दोन दिवसांत घरी परतणार असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितल्याने लोणीकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.नागरिकांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन ग्रामपंचायत आणि प्रशासनाने केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com