जनतेच्या मनातील सरकारला गणरायाचे आशीर्वाद मिळतील - विखे

प्रवरा समूहाच्या गणेशाची स्थापना
जनतेच्या मनातील सरकारला गणरायाचे आशीर्वाद मिळतील - विखे

लोणी |वार्ताहर| Loni

राज्य सरकारने काही निर्बंध शिथील केल्याने मोठा उत्साह सर्वांमध्ये दिसतो.राज्याच्या सुख समृध्दी आणि विकासासाठी सत्तेवर आलेल्या जनतेच्या मनातील सरकारला गणरायाचे आशीर्वाद मिळतील, अशी भावना महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केल्या.

प्रवरा उद्योग समुहाच्या श्रीगणेशाची स्थापना मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि शालिनीताई विखे पाटील यांच्याहस्ते कारखाना कार्यस्थळावर करण्यात आली. प्रवरा परीवारातील सर्व सहकारी संस्थांचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी याप्रसंगी उपस्थित होते. प्रवरा परीसरातील विविध गावांमध्ये गेली अनेक वर्षे एक गाव एक गणपती या संकल्पनेतून गणेश उत्सव साजरा केला जातो. लोणी बुद्रुक येथील गावात माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील आणि सुशिलाताई म्हस्के पाटील यांच्याहस्ते गणेशाची स्थापना करून यंदाच्या गणेश उत्सवाला प्रारंभ करण्यात आला.

गणेश उत्सवाच्या सर्व गणेश भक्तांना आणि मंडळांना शुभेच्छा देताना मंत्री ना. विखे पाटील म्हणाले, गणेश उत्सवाच्या पुर्वीच राज्यात जनतेच्या मनातील सरकार स्थापन झाले जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी गणरायाने आम्हाला उर्जा द्यावी, अशी प्रार्थना आपण केल्याचे मंत्री विखे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारने वेगाने निर्णय घेण्यास प्रारंभ केला आहे. त्यामुळेच विरोधकांकडून सरकार पडण्याच्या केल्या जाणार्‍या वल्गना म्हणजे मुंगेरीलाल के हसीन सपने असल्याची खिल्ली त्यांनी उडवली.

आघाडी सरकारमधील माजी मंत्री आजही विशेष सुरक्षा घेवून फिरत असल्याच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले असता मंत्री विखे म्हणाले की, दोन वर्षे हे सर्व मंत्री घरात होते. जनतेत गेले नाहीत. सत्ता गेल्यानंतरही सुरक्षेचे कवच घेवून यांना फिरावे लागते. सरकराने आदेश काढला तर लगेच व्यक्तिद्वेशाची टिका होईल. परंतु थोडीशी नैतिकता असेल तर त्यांनी सुरक्षा सोडली पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com