प्रवरा बॅकेच्या चेअरमनपदी व व्हा.चेअरमनपदी 'यांची' झाली निवड

प्रवरा बॅकेच्या चेअरमनपदी व व्हा.चेअरमनपदी 'यांची' झाली निवड

लोणी |वार्ताहर| Loni

प्रवरा सहकरी बॅकेच्या चेअरमन पदावर अशोक म्हसे आणि व्हा.चेअरमन पदी बापुसाहेब वडीतके यांची बिनविरोध निवड झाली.

बॅकेचे पदाधिकारी निवडण्यासाठी संचालक मंडळाची विशेष सभा बोलाविण्यात आली होती.सहकरी संस्थाचे उपनिंबधक जितेंद्र शेळके यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत चेअरमन पदासाठी अशोक म्हसे यांच्या नावाची सूचना माजी चेअरमन बाळासाहेब भवर यांनी मांडली त्यास संचालक छगन पुलाटे यांनी अनुमोदन दिले.

व्हा.चेअरमन पदासाठी बापुसाहेब वडीतके यांच्या नावाची सूचना माजी व्हा.चेअरमन अशोक आसावा त्यास संचालक प्रकाश शिरसाठ यांनी अनुमोदन दिले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com