शासकीय कार्यालयातून हप्ते बांधून घेतल्याने ताईंची अडचण

अ‍ॅड. ढाकणे यांचे आ. राजळे यांच्यावर आरोप
शासकीय कार्यालयातून हप्ते बांधून घेतल्याने ताईंची अडचण

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला तालुका प्रशासन वेठीस धरत आहे. सिगळ्याच शासकीय कार्यालयात जनतेकडून पैसे उकळण्याचे काम सुरु असुन त्यावर आपण एक शब्दही बोलत नाही. ताई तुमची अडचण कळते हो. सगळेच हप्ते बांधून घेतले म्हणून आमच्या बहिणीची ती अडचण झाली आहे. अशी टिका केदारेश्वर कारखान्याचे चेअरमन तथा राष्ट्रवादी काँग्रेस नेते अँड. प्रताप ढाकणे यांनी आमदार मोनिका राजळे यांच्यावर केली.

तालुक्यातील कोरडगाव पंचायत समितीच्या गणात कोरडगाव या ठिकाणी संवाद यात्रेच्या निमित्ताने अ‍ॅड. ढाकणे उपस्थित कार्यकर्ते व नागरिकांशी संवाद साधताना बोलत होते.

अ‍ॅड. ढाकणे म्हणाले, तालुक्यात आजही विज, रस्ते, पाणी हे साधे प्रश्न मोठ्या प्रमाणावर भेडसावत असून याची सोडवणूक होत नसेल तर तुमची आमदारकी फक्त सोयर्‍या धायर्‍यांमध्ये मिरवण्याकरता आहे का? तुमच्या स्वार्थी राजकारणासाठी जातीपातीचे राजकारण तुम्ही आज पर्यंत करत आहात. आमदारकीचा तालुक्यासाठी काहीच उपयोग होत नाही म्हणून आमच्या ताईला मी हिशोब मागतोय त्या काही द्यायला तयार नाहीत. असेही शेवटी ढाकणे आमदार मोनिका राजळे यांना म्हणाले.

याप्रसंगी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख भगवान दराडे, माजी नगरसेवक बंडू बोरुडे, अनिल ढाकणे, वैभव दहिफळे, सिताराम बोरुडे, दिगंबर गाडे, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष भोरू म्हस्के, उध्दव दुसंग, स्वप्निल देशमुख, त्रिंबक देशमुख, महारुद्र कीर्तने, अनिल बंड, अण्णासाहेब मुखेकर, राजु काकडे, भाऊसाहेब फुंदे, बशीर शेख, सिताराम शेळके आदी उपस्थित होते.

मुंडे कुटुंबावरील प्रेम दिखावा

पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्री करायचे म्हणून मला आमदार करा असा त्यांचा अजंडा होता. पंकजा मुंडे यांना गुरु बहीण माणतात. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गहिनीनाथ गडावर आले होते. मात्र मुंडे आल्या नव्हत्या त्या गडावर आल्या नाही. तुमचे मुंडे कुटुंबाविषयी खरे प्रेम असते तर तुम्ही गडावर गेल्या नसता असा टोला ढाकणे यांनी लगावला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com