प्रांताधिकारी मंगरुळे यांनी घेतला तळेगावचा करोना स्थितीचा आढावा

प्रांताधिकारी मंगरुळे यांनी घेतला तळेगावचा करोना स्थितीचा आढावा

तळेगाव दिघे |वार्ताहर| Talegav Dighe

संगमनेर विभागाचे प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुरेश शिंदे यांनी तळेगाव दिघे येथील ग्रामपंचायत सभागृहात अधिकारी - पदाधिकार्‍यांची बैठक घेत करोना स्थिती व उपाययोजनांचा आढावा घेतला. तळेगाव दिघे येथील वाढती करोना रुग्ण संख्या लक्षात घेता दक्षतेच्या सूचना दिल्या.

तळेगाव दिघे ग्रामपंचायत सभागृहात प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे यांच्या उपस्थितीत सोमवारी सायंकाळी आयोजित बैठकीस नायब तहसीलदार उमाकांत कडनोर, सरपंच बाबासाहेब कांदळकर, उपसरपंच रमेश दिघे, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. बी. एस. डामसे, संपतराव दिघे, दलित पँथरचे अध्यक्ष आत्माराम जगताप, ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब आंबरे, विठ्ठल दिघे, संतोष दिघे, नजीर शेख, गणेश बोखारे, भाऊसाहेब दिघे, नजीर शेख, गोकुळ दिघे, मंडलाधिकारी बाळासाहेब नांदूरकर, कामगार तलाठी पांडुरंग शिरसाठ, पोलीस पाटील देविदास कांदळकर, दत्तात्रय इल्हे, मंदाकिनी जगताप सहित पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Stories

No stories found.