
राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri
आपले सरकार जरी गेले, मंत्रीपद गेले म्हणून राहुरी, नगर, पाथर्डी मतदार संघाचा विकासाचा झंजावात थांबेल व आपली कामे होणार नाही अशी शंका येऊ देऊ नका. अडीच वर्षाच्या मंत्रिमंडळाच्या माध्यमातून जे सर्व पक्ष आमदारांना न्याय देण्याचे काम केले. त्यातून मुख्यमंत्र्यांसह अधिकार्यांशी असलेला स्नेहपूर्ण संबंधातून आपली कामे थांबणार नाहीत. याबाबत निश्चित रहा, असा विश्वास राज्याचे माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे यांनी व्यक्त केला.
राहुरीच्या पांडुरंग लॉन्स येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राहुरी, नगर, पाथर्डी मतदारसंघातील कार्यकर्ता मेळाव्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते, अध्यक्षस्थानी ज्येेष्ठ नेते गंगाधर जाधव होते. व्यासपीठावर युवा नेतृत्व हर्ष तनपुरे, प्रेरणाचे सुरेश वाबळे, बाबासाहेब भिटे, संभाजी पालवे, अमोल वाघ, स्वाभिमानीचे रवींद्र मोरे, अण्णासाहेब चोथे, किसन जवरे, रोहिदास कर्डिले, राहुल गवळी, अनिल कासार, सुरेश निमसे, विजय डौले, भारत तारडे आदी मान्यवर उपस्थित होते.
आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद निवडणुकीत सर्वांना बरोबर घेऊन वाटचाल करताना, सर्व संमतीने उमेदवार देताना, एकच द्यावा लागेल. त्यास एकमुखी साथ द्या. मी तुमच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. तर मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कटिबद्ध आहे, असेही त्यांनी सांगितले. शासन कमीत कमी चार वर्षे जात नाही, या विश्वासावर आराखडा विकास कामांचा सुरू ठेवला होता. त्यानुसार प्रलंबित कामांचा पाठपुरावा सुरू होता. कोरोनामुळे दोन वर्षे मर्यादा आल्या. परंतु दुर्दैवाने सरकार दीड वर्ष आधी गेले. तरीही कामे मार्गी लागतील याबाबत शंका घेण्याचे कारण नाही.
राज्यसभा निवडणुकीच्या वेळी धाकधूक होती. परंतु विधान परिषद निवडणुकीत सर्व काही आलबेल दिसत असताना वेगळा निकाल लागला. मुख्यमंत्रीं शिंदेंनी नगर विकास खात्याच्या माध्यमातून आपणास कायम झुकते माप दिले होते. राज्यमंत्री म्हणून काम करताना काँग्रेसच्या कॅबिनेट मंत्री पेक्षाही सेनेच्या मंत्र्यांनी योग्य न्याय दिला, असा आवर्जून उल्लेख त्यांनी केला. कोरोना नसता तर निळवंडेचे पाणी आत्तापर्यंत शेवटच्या भागात पोहोचले असते. तरीही मुख्यमंत्र्यांशी असलेल्या संबंधातून ते आपल्याला कधीही विकास कामांसाठी नाही म्हणणार नाहीत असा विश्वास आ. तनपुरे यांनी व्यक्त केला.
काल सत्ताधारी होतो आज विरोधक आहे तरीही गेल्या अडीच वर्षात मंत्र्यांना कसे धारेवर धरून काम करून घेता येते, याचा अनुभव पाठीशी आला आहे. उद्धव ठाकरे खरोखर संयमी व चांगले मुख्यमंत्री लाभले. कोरोना काळात त्यांनी केलेल्या कामाची देश पातळीवर दखल घेण्यात आली. बंडखोरी केलेल्या आमदारांना बहुतेकांना ईडीची पत्रे आल्याने हिंदुत्व धोक्यात, राष्ट्रवादी कडून अन्याय, हे सर्व खोटे असून केंद्रीय सत्तेच्या माध्यमातून विरोधकांना त्रास देऊन, विरोध संपवण्याचा जो देश पातळीवर प्रयोग सुरू आहे, तो निकोप लोकशाहीसाठी घातक आहे. याचा विचार आता जनतेने केला पाहिजे. 14 वर्षे सत्तेला बाजूला ठेवून वनवासात जाणार्या प्रभू रामचंद्राच्या नावाचा वापर करणार्यांनी सत्तेसाठी जंग जंग पछाडले, असा टोलाही त्यांनी लगावला.
यावेळी आप्पासाहेब जाधव, राष्ट्रवादी लीगल सेलचे अॅड. राहुल शेटे, तालुकाध्यक्ष एम.डी सोनवणे, सिताराम काकड,गोरक्षनाथ काकड, आप्पासाहेब चव्हाण, ज्ञानेश्वर बाचकर, प्रकाश देठे आदींसह मान्यवरांनी विचार व्यक्त केले.
या मेळाव्यासाठी ताराचंद तनपुरे, नवनाथ ढोकणे, चंद्रकांत पानसंबळ, प्रभाकर गाडे, विलास शिरसाट, सागर तनपुरे, नंदकुमार तनपुरे, विलास तनपुरे, बाळासाहेब उंडे, अशोक आहेर, गजानन सातभाई, सूर्यकांत भुजाडी, महेश झोडगे, अतुल वामन, राहुल म्हसे, लक्ष्मण म्हसे, अमोल वाघ, अभिषेक भगत, प्रशांत डौले, नितीन बाफना, दत्तात्रय वाघ, विठ्ठल मोकाटे, राहुल गवळी, दीपक तनपुरे, मधुकर भुजाडी, संतोष आघाव, पांडुरंग उदावंत, तुषार गायकवाड, आदींसह मोठ्या संख्येने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
पिंपळगाव उज्जैनचे सरपंच नाथा चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य गोरक्षनाथ काकडे, राजन मगर, अशोक मुळे, दत्तात्रय वाघ, ज्ञानदेव मगर, नवनाथ वाघ, गोवर्धन आढाव, महेश काकडे, संतोष काकडे, अशोक वाघ, श्रीकांत घोरपडे आदी कार्यकर्त्यांनी यावेळी राष्ट्रवादीत प्रवेश केला.