
नेवासा | तालुका प्रतिनिधी
नगर-औरंगाबाद महामार्गावर (Nagar-Aurangabad Highway) नेवासा फाटा (Newasa Fhata) ते नगर (Ahmednagar) दरम्यान रस्त्यावर मोठं-मोठी खड्डे पडले असून अपघाताला (Accident) कारणीभूत ठरत असलेले सर्व खड्डे बुजवून रस्त्याची तातडीने दुरुस्ती करावी या मागणीसाठी जिल्हाध्यक्ष अभिजित पोटे यांचे नेतृत्वाखाली प्रहार जनशक्ती पक्षाने (Prahar Janshakti Party) नेवासा (Newasa) तालुक्यातील पांढरीपुल (Pandharipul) एमआयडीसी (MIDC) येथे रस्त्यातील खड्ड्यात वृक्षारोपण करून सार्वजनिक बांधकाम खात्याचे (PWD) लक्ष वेधले आहे.
नगर-औरंगाबाद (Nagar-Aurangabad Highway) रस्त्यावर प्रचंड खड्डे पडले आहेत. खड्डे हुकविण्याच्या नादात वाहन अपघात (Accident) होत आहेत. तसेच वाहनांचे ही मोठे नुकसान होत आहे. विशेष म्हणजे मागील तीन-चार महिन्यांपूर्वी नगर-औरंगाबाद रस्ता दुरुस्तीचे काम झालेले आहे. अवघ्या तीन महिन्यात हा रस्ता उखडला व मोठं मोठी खड्डे पडली असल्याने रस्त्याचे कामाचे गुणवत्तेवर प्रश्न चिन्ह उभे राहिले आहे. हे काम करणाऱ्या ठेकेदाराची चौकशी करून त्याच्यावर कारवाई करावी अशी मागणी करून प्रहारने रस्त्यातील खड्ड्यात वृक्षारोपण करून सार्वजनिक बांधकाम विभागाचे (Public Works Department) लक्ष वेधले आहे.
प्रहारचे जिल्हा संघटक महादेव आव्हाड यांनी प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांसह खड्ड्यात वृक्षारोपण (Plantation) करून निषेध व्यक्त केला. आठ दिवसात खड्डे बुजवले नाही तर सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय अहमदनगर येथे तीव्र आंदोलन करणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. याप्रसंगी प्रहार सोशल मीडिया प्रमुख संजय वाघ, नेवासा तालुका युवक कार्याध्यक्ष महारुद्र आव्हाड यांचे सह प्रहार सैनिक, परिसरातील नागरिक उपस्थित होते.