प्रभू श्रीराम यांचा अनादर राष्ट्रवादी युवक आक्रमक

कपिल पवार : जिल्ह्यात पडसाद उमटणार
प्रभू श्रीराम यांचा अनादर राष्ट्रवादी युवक आक्रमक

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

प्रभू श्रीराम (Prabhu Shriram) यांच्या नावाने मतांचे राजकारण (Political) करणार्‍या भाजपच्या आमदाराने (BJP MLA) साक्ष प्रभू श्रीराम (Prabhu Shriram) यांच्यावर मुक्ताफळे उधळली आहेत. सातारा जिल्ह्यातील (Satara District) खटाव तालुक्यातील सातेवाडी (Satewadi) येथे जाहीर सभेत आ. जयकुमार गोरे (MLA Jaykumar Gore) यांनी ही मुक्ताफळे उधळली आहेत. स्वत:ची स्तृती करतांना त्यांनी प्रभू राम यांची अवहेलना केली असून याचा जिल्हा युवक राष्ट्रवादीकडून (District Youth NCP) निषेध (Protested) करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष कपिल पवार (Kapil Pawar) यांनी दिली. याचे पडसाद जिल्ह्यात उमटणार असल्याचे त्यांनी सांगितले.

याबाबत अधिक माहिती देतांना जिल्हाध्यक्ष पवार (Kapil Pawar) यांनी सांगितले की, सध्या आ. गोरे (MLA Jaykumar Gore) यांचा वाद्गस्त व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्याविरोधारत संताप व्यक्त होत आहे. ज्या प्रभू रामचंद्रांच्या नावावर मतांचा जोगवा मागणारा भारतीय जनता पक्ष, प्रभू श्रीरामचंद्राच्या मंदिरासाठी शेकडो कोटी जमा करत असून महाराष्ट्रात (Maharashtra) सत्तेवर असतांना आ. राम कदम (MLA Ram Kadam) यांंनी मुली पळवून आणण्याची भाषा करत होते.

पंढरपूरचे आ. प्रशांत परिचारक (Pandharpur MLA Prashant Parichark) यांनी भारतीय सैनिकांच्या यांच्या कुटूंबाबद्दल वाद्गस्त विधान केले असून आता माण खटावचे विद्यमान आ. गोरे यांनी अहंकाराच्या मर्यादा ओलांडून केलेल्या वक्तव्याचा नगर जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जाहीर निषेध करत करण्यात येत आहे. तसेच समाजाच्या भावना दुखावल्या बद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांची आमदारकी रद्द करावी, अशी मागणी जिल्हाध्यक्ष कपिल पवार,कार्याध्यक्ष संजय कोळगे यांनी केली आहे.

लवकरच या विषयावर रान पेटवण्यासाठी युवक राष्ट्रवादी अक्षय भालेराव, रवींद्र मालुंजकर, संदिप सोनवणे, सचिन पवार, धीरज पानसंबळ, चंद्रकांत मरकड, नितीन धांडे, विक्रम कळमकर, राहूल वर्पे, अमोल राऊत हे बैठक घेवून दिशा ठरविणार असल्याचे पवार यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com