नव्या शैक्षणिक धोरणातील तरतुदी चांगल्या असल्या तरी अंमलबजावणीविषयी शंका- प्रा. डॉ. लवांडे

नव्या शैक्षणिक धोरणातील तरतुदी चांगल्या असल्या तरी अंमलबजावणीविषयी शंका- प्रा. डॉ. लवांडे

भेंडा |वार्ताहर| Bhenda

येथून पुढे चाळीस टक्के शिक्षण हे ऑनलाईन असणार. त्यामुळे कार्यभाराचा प्रश्न तयार होईल, हे खरे आहे. पण त्यातून विद्यार्थ्यांचे खरोखर शिक्षण होईल का? कारण शिक्षणामध्ये शिक्षणाबरोबरच शिकवणेही तितकेच महत्त्वाचे असते. नव्या पॉलिसीत अनेक भ्रामक कल्पना आहेत, त्यामुळे गोंधळाची परिस्थिती होणार आहे. हा रिपोर्ट स्वप्नवत आहे, तो कसा अस्तित्वात येईल याविषयी प्रश्नचिन्ह आहे असे प्रतिपादन प्रा. डॉ. एस. पी. लवांडे यांनी केले.

नेवासा तालुक्यातील भेंडे येथील जिजामाता शास्त्र व कला महाविद्यालयाच्या स्थानिक स्पुक्टो शाखेने प्राध्यापक आणि विद्यार्थी यांच्यासाठी आयोजित केलेल्या ‘नवीन शैक्षणिक धोरण’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.रामकिसन सासवडे होते. व्यासपीठावर संचालक प्रा. डॉ. नारायण म्हस्के, स्पुक्टोचे जिल्हा अध्यक्ष प्रा. प्रकाश वाळुंज, स्थानिक शाखेचे अध्यक्ष प्रा. डी. एस. वाकचौरे, सचिव प्रा. व्ही. डी. अडसुरे, प्रा. विजय ठाणगे, प्रा. डॉ. काकासाहेब लांडे हे होते.

डॉ. लवांडे पुढे म्हणाले की, तरतुदी चांगल्या आहेत, पण त्याची अंमलबजावणी कशी करायची हा कळीचा प्रश्न आहे. सगळ्या महाविद्यालयांना एकत्र आणायच्या आहेत. हे एकत्रीकरण सहजासहजी होण्याची शक्यता नाही. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या स्पुक्टो संघटनेचे अध्यक्ष डॉ. के. एल. गिरमकर यांचे व्याख्यान झाले. त्यांनी नवीन शैक्षणिक धोरणाविषयी सर्वांनी जागृत राहिले पाहिजे. विशेषतः विद्यार्थी वर्गाने अधिक सजग राहिले पाहिजे. अन्यथा भविष्यात गंभीर परिणामांना तोंड द्यावे लागेल. असे प्रतिपादन केले. अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य डॉ. सासवडे यांनी नव्या शैक्षणिक धोरणातील विसंगती, प्रश्न मांडले.

यावेळी उपप्राचार्य प्रा. डॉ. आर. एम. नवल, उपप्राचार्य प्रा. डॉ. एस. बी. काळे, प्रा. डॉ. शिरीष लांडगे, प्रा. डॉ. संजयय महेर, प्रा. पांडुरंग देशमुख, प्रा. डॉ. रामदास आरले, प्रा. गोपीनाथ क्षीरसागर, प्रा. डॉ. नबीलाल सय्यद, प्रा. किरण खरड, प्रा. वैभव लाटे, प्रा प्रवीण घारे, प्रा. लतीफ शेख आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.