वीज कर्मचारी सोमवारी करणार काम बंद आंदोलन

वीज कर्मचारी सोमवारी करणार काम बंद आंदोलन

अकोले |प्रतिनिधी| Akole

महाराष्ट्र राज्यातील महावितरण, पारेषण व वीज निर्मिती कंपनीतील सर्व कर्मचारी, अभियंते, अधिकारी, कंत्राटी कामगार यांना फ्रंटलाईन वर्करचा दर्जा देणे व कर्मचार्‍यांसाठी राबविण्यात येत असलेल्या वैद्यकीय योजनेत परस्पर नेमलेला टिपीए बदलणे या मागणी साठी वीज कर्मचारी सोमवारी (दि.24) राज्यभर काम बंद आंदोलन आहे असा निर्णय प्रमुख संघटनांच्या संयुक्तिक समितीने घेतला आहे अशी माहिती वीज कामगार महासंघाचे जिल्हा सचिव गणेश कुंभारे यांनी दिली.

महाराष्ट्र वीज कामगार महासंघांसह वर्कस फेडरेशन, सबऑर्डीनेट इंजिनियर असोशिएशन, वीज तांत्रिक कामगार युनियन, विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन, वीज कामगार काँग्रेस या कृती समितीतील प्रमुख सहा संघटना प्रदेश पातळीवरील पदाधिकार्‍यांच्या ऑन लाईन झालेल्या बैठकीत हा निंर्णय घेण्यात आला. त्यात वीज कर्मचारी, अधिकारी, अभियंते, कंत्राटी कामगार यांना फ्रंटलाईन वर्करचा दर्जा न दिल्याने आत्ता पर्यंत 400 पेक्षा कर्मचारी मयत झाले.

वीज कर्मचार्‍यांना फ्रंटलाईन वर्करचा दर्जा देऊन अग्रक्रमाने त्यांचे व कुटुंबियांचे लसीकरण करण पूर्ण करावे, कोविडमुळे मृत्यू पावलेल्या कर्मचार्‍यांचा वारसांना पन्नास लाख रुपये अनुदान द्यावे, वीज बिल वसुलीची सक्ती थांबवावी त्याच प्रमाणे मेडिक्लेम पॉलीसीत सन 2020 पासून उर्जा विभागाकडून संघटनांना विचारात न घेता परस्पर टिपीए नेमणे यामुळे कर्मचारी वर्गात असंतोष आहे. राज्य भरात करोना बाधित शेकडो कर्मचारी उपचार घेत असताना सुमार दर्जाचा टिपीए नेमून उर्जा विभागाने कोणाचे हित साधले? याची चर्चा कर्मचारी वर्गात आहे. व त्याचे रुपांतर असंतोषात झाले असून संघटनांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे.

काम बंद आंदोलन असले तरी कोविड सेंटर, दवाखाने यांचा वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी कर्मचारी प्रयत्नशील असतील मात्र अत्यावश्यक सेवेमध्ये येत नसलेली नवीन विद्युत पुरवठा देणे, ग्राहकांच्या नावात बदल करणे, स्थळ तपासणी अहवाल, नवीन वीज पुरवठा सर्वे, ग्राहकांना फोन करुन किंवा त्यांचे प्रिमायसेस मध्ये जाऊन वीज बील भरण्यास आग्रह करणे, थकित बाकी असलेल्या वीज ग्राहकांचा विद्युत पुरवठा खंडित करणे, थकित बाकी असलेल्या वीज ग्राहकांना नोटीस देणे, वीज चोर्‍या पकडणे, ग्राहकांचे वीज बील दुरुस्त करणे, मान्सुनपुर्व कामे करणे, सर्व मेंटेनन्स व टेस्टींगची कामे अशी कुठलेही कामे व इतर कोणतीही कामे कर्मचारी करणार नाहीत अशी माहिती वीज कामगार महासंघाचे नाशिक परिमंडळ अध्यक्ष संजय दुधाने यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com