साडेतेरा लाखांची वीज चोरी पकडली

कुरणपूर, लोहगाव व नांदूरच्या तिघांविरूद्ध गुन्हा दाखल
साडेतेरा लाखांची वीज चोरी पकडली
File Photo

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

महावितरण कंपनीच्या बाभळेश्वर उपविभागातील अधिकारी व कर्मचार्‍यांच्या पथकाने तीन ठिकाणी छापा टाकून 13 लाख 56 हजार 610 रुपयांची वीज चोरी पकडली. याप्रकरणी तीन जणांविरूद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

श्रीरामपूर तालुक्यातील कुरणपूर येथील दूध डेअरीसह राहाता तालुक्यातील लोहगाव येथील औद्योगिक गिरणी व नांदूर येथील घरगुती वीज चोरीचा त्यात समावेश आहे.

श्रीरामपूर तालुक्यातील कुरणपूर येथे सोहम मिल्क अ‍ॅण्ड मिल्क प्रॉडक्ट येथे चोरून वीज वापरल्याप्रकरणी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या बाभळेश्वर उपविभागातील सहाय्यक अभियंता सुरभि राजेश कनोजिया यांच्या फिर्यादीवरून अजित महादेव कारंडे (रा. कुरणपूर, ता. श्रीरामपूर) याच्याविरुद्ध श्रीरामपूर तालुका पोलिसात गुरनं. 370, भारतीय विद्युत कायदा 2003 कलम 135, 138 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. दि. 5 ऑक्टोबर 2021 पूर्वी 12 महिन्यांकरिता सोहम मिल्क अ‍ॅण्ड मिल्क प्रॉडक्ट, कुरणपूर येथे महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीची 78, 336 युनिट प्रमाणे एकूण 12 लाख 24 हजार 770 रुपयांची वीज चोरून वापरल्याचे कनोजिया यांनी फिर्यादीत म्हटले आहे. सदरचा गुन्हा श्रीरामपूर शहर पोलिसांकडे तपासासाठी वर्ग करण्यात आला.

दुसर्‍या घटनेत राहाता तालुक्यातील नांदूर येथील अभंग नावाच्या इसमाने त्याच्या घरी 130 युनिट वीज घरात चोरून वापरली. तिची किंमत 4 हजार 300 रुपये आहे. महाराष्ट्र राज्य वीज कंपनी बाभळेश्वर उपविभागातील ममदापूर ग्रामीण कक्षाचे कनिष्ठ अभियंता सचिन सीताराम बेंडकुळे यांच्या फिर्यादीवरून श्रीरामपूर तालुका पोलिसांत भास्कर तुळशीराम अभंग, (रा. नांदूर, ता. राहाता) याच्याविरुद्ध भारतीय विद्युत कायदा 2003 कलम 135, 138 प्रमाणे वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरचा गुन्हा पुढील तापासासाठी शहर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.

तिसर्‍या घटनेत राहाता तालुक्यातील लोहगाव येथे औद्योगिक गिरणीमध्ये महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीची 1,179 वीज युनिट किंमत 1 लाख 27 हजार 540 बीज गिरणीसाठी चोरून वापरली. याप्रकरणी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या बाभळेश्वर उपविभागातील सहाय्यक अभियंता सुरभि राजेश कनोजिया यांच्या फिर्यादीवरून मंगल उमेश काळे, (रा. लोहगाव, ता. राहाता) यांच्याविरुद्ध श्रीरामपूर तालुका पोलिसांत भारतीय विद्युत कायदा 2003 कलम 132, 138 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. सदरचा गुन्हा अधिक तपासासाठी लोणी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com