पवारवाडीचा वीजपुरवठा विस्कळीत

भरधाव कारमुळे मोडला खांब
पवारवाडीचा वीजपुरवठा विस्कळीत

पारनेर (तालुका प्रतिनिधी)

पुणे महामार्गावर सुपा-पवारवाडी शाळेजवळ कार चालकाला वळण घेता न आल्याने, तसेच कारवरील नियंत्रण सुटल्याने कारने रस्ता ओलांडून विजेच्या खांबावर आदळली व पलटी झाली. यामुळे पवारवाडीचा वीज पुरवठा विस्कळीत झाला आहे.

याबाबत पवारवाडी येथील महेश पवार यांनी सांगितले, गुरुवारी रात्री ते शुक्रवारी पहाटेच्या दरम्यान कार क्रमांक एमएच 14, 3656 ही गाडी पुण्याकडून नगरच्या दिशेने जात असताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. पवारवाडी शाळे जवळील वळणावर गाडी रस्त्याच्या खाली उतरली व रस्तच्याकडेला असलेल्या विजेच्या खांबावर धडकली व पुढे आडबाजुला जाऊन पलटी झाली.

गाडीच्या धडकेने विजेचा खांब मोडला असून तारा तुटल्या आहेत. सकाळी वीज नसल्याने चौकशी केली असता एक कार विजेच्या खांबाजवळ उलटल्याची दिसून आली. सुपा पोलीस स्टेशनला चौकशी केली असता याबाबत शुक्रवारी दुपारपर्यंत फिर्याद देण्यासाठी आले नव्हते. हा अपघात शुक्रवारी पहाटे झाल्याचा अंदाज आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com