सणासुदीच्या काळात वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याची मागणी

वीज
वीज

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

गेल्या काही दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू असून सतत वीजपुरवठा खंडित होत आहे. सध्या सणासुदीचे दिवस सुरू असल्याने महावितरणने वीज पुरवठा सुरळीत ठेवावा, अशी मागणी येथील सिंधी समाजाच्यावतीने करण्यात आली आहे.

सध्या सणासुदीचे दिवस आहेत. रमजानचा महिना व उपवास सुरू आहे, रामनवमी जवळ आली आली आहे. तसेच सय्यदबाबांचा उरुसही जवळ आला असून यावर्षी मोठ्या प्रमाणात उरुस व रामनवमी उत्सव साजरा केला जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या परीक्षाही याच काळात सुरू आहेत, खंडित विजेमुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत आहे.

उन्हाची तिव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. थंड पदार्थ, थंड पेयांची दुकाने खंडित वीज पुरवठ्यामुळे अडचणीत आली आहेत. यामुळे व्यापारी वर्गात संताप आहे. वीज महावितरण कंपनीने या सर्व बाबींचा विचार करून वीज पुरवठा खंडित होऊ न देता सुरळीत सुरू ठेवावा, अशी मागणी सिंधी समाजाच्या प्रमुखांनी केली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com