वीजकेंद्र क्षमता वाढ आराखड्याला शासनाचा 120 कोटींचा निधी - आ. पवार

वीजकेंद्र क्षमता वाढ आराखड्याला शासनाचा 120 कोटींचा निधी - आ. पवार

कर्जत/ जामखेड |प्रतिनिधी| Karjat| Jamkhed

कर्जत-जामखेड मतदारसंघातील विजेची समस्या सोडवण्यासाठी नवीन विज उपकेंद्र व उपकेंद्राची क्षमता वाढवण्याच्या वीज वितरण हानी कमी करण्यासाठी 53.76 कोटी तर वीज वितरण प्रणालीत सुधारणा करण्यासाठी 66.76 कोटी रुपये अशा एकूण 120.48 कोटी रुपयांच्या आराखड्याला शासनाने मंजुरी दिली असल्याची माहिती आ. रोहित पवार यांनी दिली.

कर्जत-जामखेड मतदारसंघातील विविध गावांची विजेची होत असलेली समस्या लक्षात घेऊन नवीन वीज उपकेंद्र उभारण्यात यावे व आहे त्या उपकेंद्राची क्षमता वाढवण्यात यावी असा अराखडा आ. पवार यांनी मांडला होता. नव्याने चिलवडी व चौंडी येथे नवीन वीज उपकेंद्रासाठी आमदार रोहित पवार यांच्या प्रयत्नातून शासनाच्या प्रणाली सुधारणा पद्धत या योजनेतून मंजुरी मिळाली आहे. तसेच मिरजगाव, भांबोरा, खांडवी, कुळधरण, भाणगाव येथील असलेल्या उपकेंद्राची क्षमता वाढवण्याला देखील शासनाने मंजुरी दिली आहे.

नवीन वीज उपकेंद्र मंजूर झाल्याने व पूर्वीच्या उपकेंद्राची क्षमता वाढवल्याने वीजपुरवठा होत असताना ज्या अडचणी येतात त्या सोडवण्यास मदत होणार आहे. यासोबतच मतदारसंघात काही ठिकाणी सोलर प्रकल्पदेखील उभारण्यात आले असून वीजपुरवठा अखंडित व्हावा व पुरवठ्यात सातत्य असावे यासाठी विविध ठिकाणी नवीन लिंक लाईनचे काम, नवीन विद्युत रोहित्र बसवणे, शेतातील नादुरुस्त झालेले रोहित्र त्वरित बदलून देणे अथवा दुरुस्त करून देणे यांसह अनेक ठिकाणी नव्याने वीज उपकेंद्रांची उभारणी करण्यात येत आहे.

या योजनेच्या अंतर्गत कर्जत व जामखेड दोन्ही तालुक्यांत आपण सर्वेक्षण करून घेतले व आराखडा बनवला. हा आराखडा सातत्याने पाठपुरावा करून सरकारकडून मंजूर करून घेतला आहे. यामुळे वीज वितरणाच्या पायाभूत सुविधा सुधारण्यास मदत होणार असून शेतकर्‍यांनाही याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.

- आ. रोहित पवार

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com