ना. विखे यांचेकडून पोल्ट्रीधारकांचे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन

ना. विखे यांचेकडून पोल्ट्रीधारकांचे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन

अकोले |प्रतिनिधी| Akole

राज्यातील 36 जिल्ह्यांतील 9 लाख पोल्ट्री धारकांचे शोषण होऊ नये यादृष्टीने त्यांचे विविध प्रश्न समजावून घेऊन सर्व मागण्या राज्याचे पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मान्य केल्या असून त्या लवकर सोडविण्यात येतील, असे आश्वासन ना. विखे यांनी दिल्याची माहिती महाराष्ट्र राज्य पोल्ट्री योध्दा फेडरेशनचे अध्यक्ष अनिल खामकर व प्रवक्ते बाळासाहेब कानवडे यांनी दिली.

दि. 3 नोव्हेंबर 2022 रोजी विधान भवन, पुणे येथे राज्याचे पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या अध्यक्षतेखाली व आयुक्त पशुसंवर्धन यांच्या प्रमुख उपस्थितीत पोल्ट्रीधारकांच्या प्रश्नांसंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीसाठी कंपन्यांचे प्रतिनिधी, संघटनेचे प्रतिनिधी व पोल्ट्री व्यवसायिकांचे प्रतिनिधी, बँकर्सचे प्रतिनिधी हे उपस्थित होते. यावेळी पोल्ट्री धारकांच्या संघटनेने मागण्या बैठकीत मांडल्या.

त्या सर्व मागण्यांबाबत सविस्तर चर्चा करून खालील मागण्या मान्य करण्यात आल्या. कुक्कुटपालनासाठी वापरण्यात येणार्‍या जमिनीवर फक्त कृषिक आकारणी करावी. कॉन्ट्रॅक्ट फॉर्मिंग व खाजगी फॉर्मिंग तसेच अंडे उत्पादन करणार्‍या शेतकर्‍यांचे शोषण होऊ नये, म्हणून उपाययोजना करावी, पोल्ट्रीसाठी लागणारे वीज बिल आकारणी ही कृषी पंपाच्या दराने करावी, कंपनी देण्यात येणारी पिले व खाद्य यांचा दर्जा तपासण्यासाठी प्रयोगशाळेची निर्मिती करावी. या पोल्ट्री संघटनेच्या मागण्या ना. राधाकृष्ण विखे पा. यांनी मान्य केल्या.

यावेळी महाराष्ट्र राज्य पोल्ट्री योध्दा फेडरेशनचे मुख्य प्रवक्ते बाळासाहेब कानवडे यांनी या चर्चेत भाग घेऊन आपल्या मागण्या कशा रास्त आहेत हे मंत्री महोदयांना पटवून दिले.

याकामी पोल्ट्री संघटनेचे अनिल खामकर, साळवी, सर्जेराव भोसले, बाळासाहेब देशमुख, श्री. गोंडाबे, गोपाळे गुरुजी, बाळासाहेब कानवडे, श्री. लसने, जितू साबळे, दीपक शेवंते आदींसह अनेक नेत्यांनी संघटनेची बांधणी करून महत्त्वपूर्ण योगदान दिले.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com