कुक्कुटपालन कंपनीला 54 लाखांचा गंडा; आणखी दोघे गजाआड

चार दिवस पोलीस कोठडी; नगर तालुका पोलिसांची कारवाई
कुक्कुटपालन कंपनीला 54 लाखांचा गंडा; आणखी दोघे गजाआड

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

अलिबाग (जि. रायगड) येथील एका कंपनीच्या 54 लाखांची फसवणूक प्रकरणी (Fraud Case) नगर तालुका पोलीस ठाण्यात (Nagar Taluka Police Station) दाखल असलेल्या गुन्ह्यातील आणखी दोन आरोपींना पोलिसांनी अटक (Arrested) केली आहे. दीपक रंगनाथ भोर व सुहास किसन महांडुळे (दोघे रा. भोरवाडी ता. नगर) अशी अटक (Arrested) केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांना न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी (Police Cell) दिली आहे. दरम्यान या गुन्ह्यात सुरूवातीला महेश बबन भोर (रा. निमगाव वाघा ता. नगर) याला अटक केले आहे. मंगळवारी त्याच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्याला पुन्हा न्यायालयासमोर हजर केले असता आणखी तीन दिवस पोलीस कोठडी (Police Cell) दिली आहे.

या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप (API Rajendra Sanap) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक युवराज चव्हाण करीत आहेत. अलिबाग (Alibag) येथील प्रिमीयम चीक फिड्स कंपनीची केडगाव (Premium Cheek Feeds Company, Kedgav) येथे शाखा आहे. कंपनी पोल्ट्री चालक शेतकर्‍यांशी करार करून त्यांना बॉयलर कोंबड्यांची (Boiler Hens) पिल्ले, खाद्य आणि औषधे देते. शेतकरी ती पिल्ले वाढवतात व त्या मोबदल्यात त्यांना पिल्लांच्या वजनावरून पैसे दिले जातात. या व्यवसायबाबत संबंधितांशी करार केले जातात.

केडगाव शाखेकडुन अनिल गुंजाळ, सुहास महांडुळे, रघुनाथ भोर या शेतकर्‍यास दिलेले पक्षी व खाद्य शेतकर्‍यांनी परस्पर विकलेले असल्याचे केडगाव येथील शाखा व्यवस्थापक शिवाजी विश्वनाथ गायकवाड यांनी कंपनीचे मालक शाम भालचंद्र ढवण यांना कळविले. त्यानंतर ढवण यांनी लेखापरीक्षक संदेश हिराचंद दांडेकर (रा. मेढेखार ता. अलिबाग, जि. रायगड) यांना शाखेचे लेखा परिक्षण करण्यास व कर्मचार्‍यांचेकडे चौकशी करण्यास सांगितले. यानंतर हा प्रकार उघडकीस आला होता.

दांडेकर यांच्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलिसांत 10 जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आतापर्यंत तिघांना अटक करण्यात आली असून आणखी सात आरोपी पसार आहेत. पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे.

Related Stories

No stories found.