कुक्कुटपालन कंपनीला 54 लाखांचा गंडा; आरोपी गजाआड

नगर तालुका पोलिसांची कारवाई
कुक्कुटपालन कंपनीला 54 लाखांचा गंडा; आरोपी गजाआड

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

अलिबाग (जि. रायगड) येथील एका कंपनीच्या 54 लाखांची फसवणूक प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील एका आरोपीला पोलिसांनी अटक केली. महेश बबन भोर (वय 35 रा. निमगाव वाघा ता. नगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.

तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक युवराज चव्हाण, पोलीस अंमलदार योगेश ठाणगे, विक्रांत भालसिंग, राजू खेडकर यांच्या पथकाने आरोपी भोर याला इस्लामपूर (जि. सांगली) येथून ताब्यात घेत अटक केली आहे. शेतकर्‍यांनी कुक्कुटपालनसाठी कंपनीकडून आणलेल्या सुमारे साडेसोळा हजार पिल्लांची कंपनीच्या कर्मचार्‍यांशी संगनमत करून परस्पर विक्री केली.

तसेच करारनाम्याच्या मूळ प्रतींची चोरी केली. या प्रकारात अलिबाग येथील प्रिमीयम चीक फिड्स कंपनीची 54 लाखांची फसवणूक झाल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी नगर तालुका पोलिसांत पोल्ट्री चालक व कंपनीतील कर्मचारी अशा 10 जणांविरोधात फसवणूक व चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.