गरिबांच्या फ्रिजला आरओच्या थंड पाण्याचा फटका

गरिबांच्या फ्रिजला आरओच्या थंड पाण्याचा फटका

माठ विक्रीवर परिणाम

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

गरिबांचा फ्रीज अशी ओळख असलेल्या मातीच्या माठांची उन्हाची चाहूल लागताच बाजार पेठेत उपलब्धता होते. परंतु सध्या सर्वत्र सहज स्वस्तात उपलब्ध होत असलेल्या आरओ यंत्राच्या शुद्ध आणि थंड पाण्याच्या परिणामी माठ विक्रीला फटका बसत असल्याचे वास्तव आहे. परिणामी या व्यावसायवर अवलंबून असलेला कुंभार समाज अडचणीत आला आहे.

मातीचे माठ हे 100 रुपया पासून ते 500 रुपया पर्यंत बाजारपेठेत ऊपलब्ध आहेत. रंगी बेरंगी माठ असलेल्या बाजार पेठेत माठ उपलब्ध आहेत. माठा मध्ये बदल करून त्यास तोटी, झाकण असलेली वेगळे माठ ग्राहकांना आकर्षित करितल असे माठ उपलब्ध आहेत. पण पारनेर शहर व परिसरात बहुतांश ठिकाणी आरओ प्लांट व थंड पाण्याचे जार सहज उपलब्ध होत असल्याने ग्रामीण भागातील गरिबांचा फ्रीज असलेला विविध आकारात असलेले माठ हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे. असे प्रथम दर्शनी निदर्शनास येत आहे.परिणामी पारंपरिक कुंभार समाज करत असलेल्या या व्यवसाातील व्यवसायिक बेरोजगारीच्या उंबरठयावर असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

उष्णतेच्या पार्‍याने चाळिशी पार केलेली आहे. शेतात किंवा प्रवासात पाण्यासाठी जार सोयीचा आहे. अगदी दिडशे, दोनशे रूपयांत भरलेला जार मिळतो. या मुळे गरिबांचा फ्रीज असलेला माठ जवळ जवळ हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे. गावो गावी आरओ फिल्टरचे प्लांट सुरु झाले आहे. त्या मुळे शुध्द व थंड पाणी काही ठिकाणी मोफत तर काही ठिकाणी अवघ्या पाच रुपयात मिळू लागले आहेत. त्या मुळे माठाचा व्यवसाय कमी झाला आहे. उन्हाळ्यात 500 ते 600 माठ विक्री होणारे अवघे 200 पर्यंत विक्री होत आहेत. ग्रामीण भागात जल शुध्दीकरण केंद्र झाल्याने माठाचा व्यवसाय थंडवला आहे. थंड पाणी बाटली देण्याच्या स्पर्धेत मोठ्या कंपन्या आहेत. या स्पर्धेत माठ उत्पादक टिकत नसल्याने त्यांच्या अडचणींमध्ये वाढ झाल्याचे व्यावसायिकांनी सांगीतले.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com