
पारनेर | सुरेंद्र शिंदे| Parner
गरीबाचा फ्रिज म्हणून मातीच्या माठाची ओळख आहे, परंतु बदलत्या काळानुसार या माठाचे रुप बदलले असुन आता माठ माँर्डन झाले आहेत. तोटीसह आकर्षक कलाकुसर असलेल्या माठांना श्रीमंतांकडूनही मागणी वाढली आहे. मात्र कच्च्या मालाच्या वाढत्या दराने माठाच्या किंमतीतही मोठी वाढ झाली आहे.
उन्हाळ्याच्या दिवसात जीवाला थंडावा देण्यासाठी व तहान भागवण्यासाठी नागरिक सर्रास मातीचे माठ वापरतात. पाणीही गोड चवदार लागते व शरीरालाही काही अपाय नाही . त्या तुलनेत इलेक्ट्रिक फ्रिज जास्त थंड पाणी देतात परंतु त्याला म्हणावी तशी चवही नसते .व ते शरीराला आपायकारक असते म्हणून उन्हाळ्यात गरिब आपली परस्थिती म्हणून तर श्रीमंत शरिराच्या सुरक्षिततेसाठी मातीच्या माठाचा वापर करतात , गरीबाचा फ्रिज म्हणून ओळख असलेला माठ आता आपल्या नवनव्या रुपामुळे श्रीमंताच्या घरचा शो पिस बनला आहे . ग्राहकही या नवनव्या रुपातील माठांनाच मोठी पसंती देत आहेत .
यापूर्वी काळे, ढोले, बसके असलेले माठांमध्ये मोठा बदल झाला आहे. आता अधुनिक रंगीबेरंगी विविध आकारातील माठ आता बाजारात मिळत आहेत. माठाला तोटी, अधुनिक आकार, त्यावर सुंदर नक्षीकाम, कलाकुसर असेही माठ बाजारात मिळत आहेत. आता घरातील फर्निचर व स्वयंपाक खोलीच्या रचना व रंगसंगतीनुसार माठ घरात ठेवले जात आहेत. यामुळे गरिबाच्या झोपडीतील माठ श्रींमताच्या घरचा शोपीस झाल्याचे बोलले जात आहे.
माठाच्या पाण्याच्या महतीवरून आता आरोग्याच्यादृष्टीने सध्या गरिबांपेक्षा श्रीमंत लोकच पिण्याच्या पाण्यासठी फ्रिज ऐवजी मातीच्या माठांना महत्त्व देत आहेत. यामुळे माठांना सध्या सर्वत्र चांगले दिवस आले आहेत. परंतु कच्च्या मालात झालेली वाढ, वाढती मजुरी यामुळे माठाच्या किमतीत दरवर्षीच मोठी वाढ होत आहे. चालू वर्षी 20 ते 40 टक्क्यांपर्यंत किमती वाढल्या असल्याचे व्यावसायिक सांगत आहेत.
जुन्या पिढीतील माठ बनवणारांची संख्या घटत असून कष्ट जास्त असल्याने नवीन पिढी या पारंपरीक व्यवसायात उतरत नाही . तर कच्चा माल असणारी विशिष्ट माती, भट्टीसाठी आवश्यक जळण या गोष्टीही सहजासहजी मिळत नाही .त्यामुळे हा व्यवसाय पारंपरीक कारागिरासाठी मोठ्या जिकरीचा झाला आहे.
- संतोष गोरे, माठ विक्रेते, कुंभार