महिलेचा अश्‍लिल फोटो सोशल मीडियावर व्हायरल ; तरूण पसार

ब्राह्मणी-चेडगाव परिसरातील घटना
महिलेचा अश्‍लिल फोटो सोशल मीडियावर व्हायरल ; तरूण पसार

राहुरी (प्रतिनिधी) - राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी-चेडगाव परिसरातील एका महिलेचा अश्‍लील फोटो सोशल मीडियाच्या एका ग्रुपला व्हायरल झाल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

दरम्यान, ब्राम्हणी परिसरातील महिलांचे मेकअपचे साहित्य विक्रीचे दुकान असलेल्या एका तरुणाने हा फोटो व्हायरल केल्याची दबक्या आवाजात चर्चा सुरू असून ज्या दिवशी तो फोटो व्हायरल झाला, त्याच दिवसापासून तो तरूण गावातून पसार झाला आहे. त्यामुळे या तरूणावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

ब्राह्मणी-चेडगांव हा ग्रामीण भाग असून मोबाईलवर व्हॉट्सअ‍ॅपचे मोठे नेटवर्क कार्यरत आहे. तर सोशल मीडियाचेही मोठे ग्रुप आहेत. या भागातील एका ग्रुपवर एका महिलेचा अश्‍लील फोटो व्हायरल झाला. हा फोटो अनेकांनी पाहिल्यामुळे त्याची दिवसभर चर्चा सुरू होती. ज्याच्याकडून फोटो व्हायरल झाला तो तरुण ब्राह्मणी परिसरातला असून त्याचे ब्राह्मणी परिसरामध्ये महिलांना मेकअपसाठी लागणारे साहित्य विक्रीचे दुकानही असल्याची चर्चा सुरू आहे.

ज्या महिलेचा फोटो व्हायरल झाला, त्या महिलेला काही हितचिंतकांनी फोन करून तुमचा फोटो व्हायरल झाला असल्याचे सांगितले. त्यामुळे तिने तात्काळ ज्याच्याकडून हा फोटो व्हायरल झाला, त्याला फोटो ताबडतोब डिलीट करण्याचे सांगितले. नंतर त्या युवकाने काही तज्ज्ञांचा सल्ला घेऊन हा फोटो त्या ग्रुपमधून डिलीट केला. मात्र, त्यापूर्वीच अनेक तरुणांनी त्या फोटोचे मोबाईलवर स्क्रीनशॉट काढल्याचे समजते.

दरम्यान, त्या तरुणाची लेडीज शॉपी असल्याने अनेक महिला, मुली साहित्य खरेदी करण्यासाठी जातात. अनेकांना तो अश्‍लिल भाषेत बोलला होता. त्यावेळी अनेक महिलांनी त्याला त्या ठिकाणी सडेतोड उत्तर दिल्याची चर्चा सध्या ब्राह्मणी परिसरामध्ये सुरू आहे. हा फोटो व्हायरल करणार्‍या तरुणावर पोलीस काय कारवाई करणार? याकडे ब्राह्मणी-चेडगाव परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com