<p><strong>अहमदनगर | Ahmednagar </strong></p><p>राज्याचे लक्ष लागून असलेल्या हिवरे बाजारच्या निवडणुकीत पोपटराव पवारांच्या आदर्श ग्रामविकास पॅनेलने सर्व सातही जागा जिंकल्या आहेत.</p>.<p>हिवरेबाजारमध्ये 1989 पासून ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होत आली आहे. यंदा मात्र हिवरेबाजारमध्ये बिनविरोध निवडणूक होऊ शकली नव्हती. त्यामुळे गेल्या 30 वर्षांची परंपरा यंदा खंडीत झाली होती. पण पोपटराव पवार यांच्या आदर्श ग्रामविकास पॅनलला विजय मिळाल्यानं हिवरे बाजारमधील ग्रामस्थांनी पोपटराव यांच्या नेतृत्वावर पुन्हा विश्वास दाखवल्याचंच पाहायला मिळत आहे.</p>