पद्मश्री पुरस्कार प्राप्त पोपटराव पवारांचे पारनेरमध्ये जोरदार स्वागत

पद्मश्री पुरस्कार प्राप्त पोपटराव पवारांचे पारनेरमध्ये जोरदार स्वागत

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

आदर्शगाव योजनेचे राज्याचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांना मंगळवारी नवी दिल्लीत पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्यानंतर तेथून परतताना पारनेर तालुक्यात ठिकठिकाणी त्यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले.

आज सकाळी वाडेगव्हाण फाटा येथे आ. निलेश लंके यांनी त्यांचे स्वागत केले. राळेगणसिध्दीमध्ये ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या चरणी नतमस्तक होत पोपटरावांनी हजारे यांचे आशिर्वाद घेतले. पारनेर येथे हिंद चौकात फटाक्यांची आतषबाजी करीत पवार यांचे स्वागत करण्यात आले. तसेच ढोलताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीदरम्यान अनेक नागरिकांनी पवार यांना पुष्पगुच्छ देत अभिनंदन केले.

नागेश्वर गल्लीत नागेश्वर मित्र मंडळाच्यावतीने पवारांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. तेथे पंचायत समतीचे सभापती गणेश शेळके, पंचायत समितीचे सदस्य डॉ. श्रीकांत पठारे, भाजपाचे तालुकाध्यक्ष वसंत चेडे, सभापती गणेश शेळके, पंचायत समितीचे सदस्य डॉ. श्रीकांत पठारे, भाजपाचे तालुकाध्यक्ष वसंत चेडे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख रामदास भोसले, शंकर नगरे यांच्यासह नागेश्वर मित्र मंडळाच्यावतीने सत्कार करण्यात आला. वाडेगव्हाण फाटा ते हिवरेबाजार अशा चारचाकी तसेच दुचाकी वाहनांच्या रॅलीचेही आयोजन करण्यात आले होते.सुपा ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच मनीषा रोकडे यांनी पवार दाम्पत्याचा सत्कार केला.

Related Stories

No stories found.