रस्त्यांची दुरवस्था अन् सक्तीची वीज बिल वसुली विरोधात निवेदन

तातडीने उपाययोजना न झाल्यास तीव्र आंदोलन: भाजप
रस्त्यांची दुरवस्था अन् सक्तीची वीज बिल वसुली विरोधात निवेदन

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

जिल्ह्यातील राज्य व राष्ट्रीय महामार्ग रस्त्यांवर (State and National Highways) मोठ्या प्रमाणात खड्डे (Pits) पडले असून त्याचा सर्वांनाच मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच वीज वितरण कंपनीकडून (Power Distribution Company) सुरू असलेली वीज बिलाची सक्तीची वसुली (Forced recovery of electricity bill) तातडीने थांबवावी, या मागणीसाठी भाजपच्या (BJP) वतीने जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे (District President Arun Munde) यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालय येथे निदर्शने करून जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष प्रा.राम शिंदे (Prof. Ram Shinde), आ. मोनिका राजळे (MLA Monika Rajale), माजी आ.शिवाजीराव कर्डिले (Former MLA Shivajirao Kardile), बाळासाहेब मुरकुटे, स्नेहलता कोल्हे, बाळासाहेब महाडिक, दिलीप भालसिंग, कचरु चोथे, प्रतिभा पाचपुते, माणिक खेडकर, मृत्यूंजय गर्जे आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, जिल्ह्यातील प्रमुख राज्य व राष्ट्रीय रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, त्यामुळे वाहनधारक आणि प्रवाशांना मोठा त्रास सोसावा लागत आहे. आर्थिक झळीबरोबरच शारीरिक व्याधींनाही तोंड द्यावे लागत आहे. वेळेचाही अपव्यय होत आहे. कल्याण-विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गाचे काम सुमारे चार वर्षांपासून सुरू आहे, मात्र ज्या ठिकाणी काम झाले, तेथेही पावसामुळे खड्डे पडले आहेत. अशीच अवस्था जिल्ह्यातील इतर सर्वच महामार्गांची झाली आहे.

या खड्ड्यांमुळे अपघातात (Pits Problem Accident) वाढ झाली असून, त्यामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तर अनेकांना शारीरिक अपंगत्व आले आहे. तसेच सलग दोन वर्षांपासून करोना, अतिवृष्टी यामुळे शेतकरी आर्थिक संकटात असताना सक्तीची वीज वसुली करण्यात येत आहे, ती त्वरित थांबवावी. अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात लाईटचे पोल पडले आहेत, रोहित्र जळालेले आहेत, त्याची दुरुस्ती व्हावी. याबाबत नागरिक, कामगार, व्यापारी, सर्वसामान्यांमध्ये संतापाची लाट आहे. तरी तातडीने उपाययोजना न झाल्यास भाजपाच्यावतीने तीव्र स्वरुपाचे आंदोलन (Movement) करण्यात येईल, असा इशारा (Hint) निवेदनातूतन दिला आहे.

शेवगाव-पाथर्डीसाठी उपोषणाचा इशारा

ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात शेवगाव आणि पाथर्डी तालुक्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली असून या भागातील अतिवृष्टीग्रस्तांना कोकण आणि कोल्हापूरच्या धर्तीवर तातडीने भरपाई मिळावी, अशी मागणी आ. मोनिकाताई राजळे यांनी केली. यावेळी त्यांनी जिल्हाधिकार्‍यांना निवेदनही दिले आहे. या अतिवृष्टी शेतकर्‍यांच्या पिकांचे, फळबागांचे, घराचे, शेत जमीनीचे, संसारोपयोगी वस्तूंचे, वापरण्याच्या कपड्यांचे, भांडीकुंडी यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. एक महिना झाला तरी अद्याप या शेतकर्‍यांना कोणतीच मदत झालेली नाही. यातुळे येत्या आठ दिवसांत मदत न मिळाल्यास भाजपचे लोकप्रतिनिधी व पूरग्रस्तांसह जिल्हाधिकारी कार्यालय याठिकाणी उपोषण करण्याचा इशारा आ. राजळे यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे. यावेळी माणिकराव खेडकर, डॉ. मृत्यूंजय गर्जे, नंदकुमार शेळके, काशिबाई गोल्हार, आशा गरड, एकनाथ आटकर, ताराचंद लोंढे, अमोल भनगडे, बाळासाहेब पोटघन, रमेश पिंपळे, कचरू चोथे, प्रा. भानुदास बेरड, सुनील ओव्हळ, सुभाष केकाण, विष्णूपंत अकोलकर आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.