अकोले-संगमनेर रस्त्याच्या दुरावस्थेने घेतला युवकाचा बळी

अकोले-संगमनेर रस्त्याच्या दुरावस्थेने घेतला युवकाचा बळी

अकोले (प्रतिनिधी) -

सुमारे महिना भरा पूर्वी अकोले शहराजवळ झालेल्या अपघातात गंभीर रित्या जखमी झालेल्या सागर नवले (वय 32) या युवकाचे अखेर

आज निधन झाले. महिना भर मृत्यू बरोबर सुरू असणारी त्याची झुंज अखेर आज संपली. अकोले तालुक्यातील कोल्हार - घोटी रस्त्याच्या दुरावस्थेने घेतलेला हा बळी असल्याची संतप्त प्रतिक्रिया समाज माध्यमात व्यक्त होत आहे.सार्वजनिक बांधकाम विभाग, रस्त्याच्या कामाचा ठेकेदार आणि तालुक्याचे लोक प्रतिनिधी यांचे नाकर्तेपणा बद्दल अनेकांनी तीव्र शब्दात टीकास्त्र सोडले आहे.

गेल्या अनेक दिवसां पासून बारी ते संगमनेर या रस्त्याच्या नूतनीकरनाचे काम सुरू आहे.मात्र अकोले तालुक्यातील कोल्हार घोटी विठा ते कळस दरम्यानच्या या रस्त्याचे काम अनेक दिवसांपासून रेंगाळले आहे.त्यामुळे या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. काही ठिकाणी कामासाठी उकरलेला रस्ता,काम सुरू असल्या मुळे रस्त्याच्या एकेरी भागातून सुरू असणारी वाहतूक ,रस्त्यामध्ये जागोजागी पडलेले खड्डे,आणि आशा अवस्थेतील रस्त्या वरून सुरू असणारे उसाचे,वाळूचे ट्रक,अन्य जड वाहने यामुळे रस्त्याची अनेक ठिकाणी चाळन झालेली आहे, त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करणे दिवसेंदिवस धोकादायक बनत चालले आहे.त्यामुळे या रस्त्यावर वारंवार अपघात होत आहेत.

सागर नवले हा अकोलेहून रात्रीच्या वेळी आपल्या इंदोरी येथील आपल्या घराकडे चालला होता.पथिक पेट्रोल पंपा समोर रस्त्यावरील खड्ड्यांचा अंदाज न आल्या मुळे त्याचे गाडीला अपघात झाला.त्यात तो गंभीर जखमी झाला. उपचारा साठी त्याला प्रथम नाशिक व नंतर अहमदनगर येथे हलविण्यात आले.अखेर आज त्याचे उपचार सुरू असतानाच निधन झाले.त्याच्या निधनाचे वृत्त समजताच समाज माध्यमात हळहळ व्यक्त करण्यात आली. त्याचबरोबर रस्त्याच्या दारुण स्थितीमुळे घेतलेला हा बळी असल्याची भावना व्यक्त करन्यात आली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com