चांदेगाव-ब्राम्हणगाव शिवरस्त्याची दुरावस्था

चांदेगाव-ब्राम्हणगाव शिवरस्त्याची दुरावस्था

दुरुस्ती न केल्यास आंदोलनाचा इशारा

श्रीरामपूर (प्रतिनिधी) / Shrirampur - राहुरी तालुक्यातील चांदेगाव-ब्राम्हणगाव या दोन्ही गावातील म्हसेवस्ती ते मुसमाडे वस्ती शिव रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून या रस्त्याचे तातडीने खडीकरण करेन डांबरीकरण करावे, अशी मागणी या परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.

या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून त्यात पावसाचे पाणी साचल्याने वाहने चालविणे मुष्कील झाले आहे. पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहत असल्याने दुचाकी घेवून जाण्याची भिती वाटत आहे.रस्त्याच्या दुरावस्थेमुळे तेथील वाड्या वस्त्यांवरील रहिवाशी नागरीकांची जाण्या येण्याची मोठी गैरसोय होत आहे. शेतकरी व शाळकरी मुलांसह रुग्णांना रस्त्यावरून जाण्यासाठी खूप हाल सहन करावे लागत आहे.

या परिसरातील शेतकर्‍यांनी यापुर्वी दोन वेळा लोकवर्गणी करून रस्त्यावर मुरूम टाकून डागडुजी केली. परंतू त्याचा काही उपयोग झाला नाही. रस्त्याची पुन्हा तीच परिस्थिती झाली आहे. या भागातील ग्रामस्थ व शेतकर्‍यांनी अनेकदा रस्त्याचे काम करण्याची मागणी लोकप्रतिनिधींकडे केेली आहे. मात्र त्यांना आश्‍वासनापलीकडे काहीही मिळाले नाही. लोकप्रतिनिधींनी त्याकडे ढुंकुनही पाहिले नाही.

प्रशासन तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींनी या रस्त्याच्या दुरावस्थेची पाहणी करून तातडीने दुरूस्ती करावी, अन्यथा रस्त्याच्या कामासाठी आंदोलन केले जाईल, असा इशारा या परिसरातील अर्जुन काळे, सुभाष काळे, अशोक नागरे, नानासाहेब गायकवाड, दत्तात्रय शेटे, सुरेश शिंदे, संदिप वराळे, नामदेव खर्चन आदींसह शेतकर्‍यांनी दिला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com