नेवासा तालुक्यात डाळिंब चोरणारी टोळी पकडली

वडाळ्याच्या शेतकर्‍याला मारहाण करुन बागेतून चोरले होते साडेतीन लाखाचे डाळींब
नेवासा तालुक्यात डाळिंब चोरणारी टोळी पकडली

नेवासा |तालुका प्रतिनिधी| Newasa

तालुक्यातील वडाळा बहिरोबा येथील डाळींबाच्या बागेत घुसून शेतकर्‍यास मारहाण करुन 3 लाख 40 हजार रुपये किंमतीचे डाळींबाची चोरी करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेने पकडली आहे.

नेवासा तालुक्यात डाळिंब चोरणारी टोळी पकडली
कांदा निर्यात शुल्क वाढीवरून शेतकर्‍यांचे आंदोलन पेटले

याबाबत अधिक माहिती अशी की, वडाळा बहिरोबा येथील बाबासाहेब सुधाकर मोटे (वय 51) यांचे व त्यांचे शेजारील शेतकर्‍याचे शेतातील 3 लाख 40 हजार रुपये किंमतीचे परिपक्व 150 कॅरेट डाळींब अनोळखी आरोपींनी शेतकर्‍यास मारहाण करुन चोरुन नेले होते. श्री. मोटे यांच्या फिर्यादीवरुन सदर घटनेबाबत शनीशिंगणापूर पोलीस ठाण्यात गु.र.नं. 163/2023 भारतीय दंड विधान कलम 379 प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे तपासात शेतकर्‍यास 7 ते 8 आरोपींनी मारहाण करुन डाळींबाची चोरी केल्याचे निष्पन्न झाल्याने पोलीस अधीक्षक यांचे मार्गदर्शनाप्रमाणे सदर गुन्ह्यास भादविक 395 हे दरोड्याचे वाढीव कलम लावण्यात आले होते.

नेवासा तालुक्यात डाळिंब चोरणारी टोळी पकडली
भंडारदरात पुन्हा पाऊस सुरू

पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नेमून गुन्ह्याचा समांतर तपास करुन गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न करुन गुन्हा उघडकीस आणणे बाबत आदेशित केले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील हवालदार बापुसाहेब फोलाणे, दत्तात्रय गव्हाणे, अतुल लोटके, पोलीस नाईक रविंद्र कडले, संतोष लोडे, ज्ञानेश्वर शिंदे, फुरकान शेख, कॉन्स्टेबल किशोर शिरसाट, बाळासाहेब खेडकर, मेघराज कोल्हे, बाळासाहेब गुंजाळ, प्रशांत राठोड, चालक हवालदार अर्जुन बडे व चालक कॉन्स्टेबल अरुण मोरे अशा पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक नेमून आरोपींचा शोध घेवून कारवाई करणे बाबत सुचना दिल्याने पथक नेवासा परिसरात पेट्रोलिंग फिरून आरोपींची माहिती घेताना पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, वर नमुद गुन्हा हा साईनाथ आहिरे रा. कारेगाव ता. नेवासा व नवनाथ गवळी रा. आंतरवली ता. नेवासा यांनी त्यांचे साथीदारासह केला असून ते कारेगाव शिवार येथे आले आहेत. खात्रीशीर माहिती मिळाल्याने पथकाने नमुद ठिकाणी जावून आरोपींना ताब्यात घेतले.

नेवासा तालुक्यात डाळिंब चोरणारी टोळी पकडली
घोडेगाव येथे राज्य महामार्गावर आज रास्तारोको

त्यांची नावे साईनाथ बाबुराव आहिरे रा. कारेगांव व नवनाथ सोमनाथ गवळी रा. आंतरवली असे सांगितले. त्यांनी सदरचा गुन्हा त्यांचे इतर साथीदार अक्षय दिलीप आहेर (वय 22) लालू बाबुराव आहिरे (वय 30), वाल्मिक वचन आहिरे (वय 22) सर्व रा. चितळी, ता. पाथर्डी, नानासाहेब चांगदेव वडे (वय 30), प्रल्हाद शंकर पवार (वय 40), विठ्ठल सोपान बर्डे (वय 30) सर्व रा. कारेगाव ता. नेवासा, आकाश पोपट माळी (फरार) व एक विधीसंघषीत बालक अशांनी मिळून डांळीबाच्या बागेतून डाळींब तोडून मालवाहू झिप टेम्पोत भरुन मार्केटला विकून पैसे वाटून घेतल्याची कबुली दिल्याने त्यांना ताब्यात घेवुन शनिशिंगणापूर पोलीस ठाण्यात हजर केले. पुढील तपास शनिशिंगणापूर पोलीस ठाण्याचे अधिकारी करीत आहेत.

नेवासा तालुक्यात डाळिंब चोरणारी टोळी पकडली
संगमनेरात वाकचौरेंचा पुतळा भर चौकात उलटा लटकवला
   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com