शिर्डीतील चौगुले, आरणे, गायकेंसह शेळके, बर्डेंची काँग्रेसमधून हकालपट्टी

शिर्डीतील चौगुले, आरणे, गायकेंसह शेळके, बर्डेंची काँग्रेसमधून हकालपट्टी

शिर्डी (शहर प्रतिनिधी)-

शिर्डी नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चौगुले, सुरेश आरणे, प्रसाद शेळके, राजू बर्डे यांनी वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी चर्चा न करता आपल्या मनाने उमेदवारी अर्ज दाखल केला असून ही पक्षाशी बेईमानी आहे. त्यामुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात येत असल्याचे काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष रावसाहेब बोठे यांनीपत्रकार परिषदेत सांगितले.

शिर्डीतील चौगुले, आरणे, गायकेंसह शेळके, बर्डेंची काँग्रेसमधून हकालपट्टी
कोपरगाव हादरलं! भर बाजारात तरुणाचा निर्घृण खून

दरम्यान शुक्रवारी शिर्डी शहरात काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा विश्वस्त डॉ. एकनाथ गोंदकर, अशोक खंडू कोते, अॅड. अविनाश शेजवळ, अमोल कोते, अॅड. पंकज लोंढे, श्री. सदाफळ आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी पत्रकार परिषदेत बोठे म्हणाले, शिर्डी नगरपंचायतच्या निवडणुकीत संपूर्ण शिर्डी ग्रामस्थांसह सर्वपक्षीय नेत्यांनी बहिष्कार टाकला असताना शिर्डी शहर काँग्रेसचे पदाधिकारी शहराध्यक्ष सचिन चौगुले, युवकचे शहराध्यक्ष अमृत गायके, शहर उपाध्यक्ष सुरेश आरणे, प्रसाद शेळके तसेच राजू बर्डे या सर्वांनी फॉर्म भरले.

शिर्डीतील चौगुले, आरणे, गायकेंसह शेळके, बर्डेंची काँग्रेसमधून हकालपट्टी
काळजी घ्या! जिल्ह्यात वेगाने रुग्णवाढ; नगर शहरासह राहाता टॉपला

हे कृत्य पक्षाच्या दृष्टीकोनातून घातक आहे. या सर्वांना कोणाचा आदेश नव्हता, त्यांनी केलेले काम कोणालाही विचारून केलेले नाही. त्यामुळे तालुकाध्यक्ष म्हणून या सर्वांची काँग्रेस पक्षातून हकालपट्टी केली असून त्यांच्या जागी शिर्डी काँग्रेसचे शहराध्यक्ष म्हणून अशोक खंडू कोते, शिर्डी युवक शहराध्यक्ष म्हणून अविनाश शेजवळ यांची निवड करण्यात आली आहे. तर एनएसयुआयच्या तालुकाध्यक्षपदी स्वराज त्रिभुवन, उद्योग आघाडीच्या अध्यक्षपदी, तसेच अमोल कोते यांची युवकच्या कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली असल्याचे सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com