राजकीय घडामोडीत कोल्हार खुर्दच्या उपसरपंचपदी आशा भोसले

राजकीय घडामोडीत कोल्हार खुर्दच्या उपसरपंचपदी आशा भोसले

कोल्हार |वार्ताहर| Kolhar

राहुरी (Rahuri) तालुक्यातील कोल्हार खुर्द (Kolhar Khurd) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी आशा नितीन भोसले यांची अखेरच्या क्षणी निवड झाल्याने सत्ताधारी गटाला चांगलाच धक्का बसला असल्याची चर्चा गावात सुरू आहे.

कोल्हार खुर्द ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदासाठी बुधवारी निवडणूक (Election) प्रक्रिया पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी (Election Officers) म्हणून ग्रामविकास अधिकारी संजय गिर्हे यांनी काम पाहिले. यावेळी छाया बापूसाहेब शिरसाठ यांनी सत्ताधारी गटाकडून अर्ज भरला. मात्र आशा नितीन भोसले यांना मागील दोन वेळा शब्द देऊनही डावलण्यात आले. त्यामुळे त्यांनी गनिमी काव्याने विरोधी गटाशी चर्चा करून अर्ज भरला व सूचक म्हणून विरोधी गटाचेच गोरक्षनाथ कानडे यांना घेतले.

या सर्व घडामोडीचा सत्ताधारी नेत्यांना (Political Leder) काहीच थांगपत्ता नसल्याने ते बिनधास्त राहिले. आशा भोसले यांचा अर्ज वेळेत दाखल करण्यात आला. परंतु छाया शिरसाठ यांचा अर्ज तीन मिनिटे उशिरा म्हणजे अकरा वाजून तीन मिनिटांनी दाखल झाला. यावर भोसले यांचे सूचक गोरख कानडे यांनी शिरसाठ यांचा अर्ज आलेली वेळ दप्तरी नमूद करून घेण्याची मागणी केली. अन्यथा उपोषण करू, असे सांगितले. त्यामुळे छाया शिरसाठ यांचा अर्ज वेळेत दाखल न झाल्याने त्यांनी छाननीत अर्ज बाद होण्याअगोदर माघार घेतली. आशा भोसले यांच्या उपसरपंच निवडीचा मार्ग मोकळा झाला.

कोल्हार खुर्दच्या राजकीय (Political) रंगमंचावर या खेळीने चांगलीच उलथापालथ झाली. दिग्गज म्हणवणारे कोल्हार खुर्द मधील ग्रामपंचायतचे नेते या खेळीने शुल्लक विरोधी कार्यकर्त्यांपुढे धोबीपछाड झाले. आशा भोसले यांच्या निवडीबद्दल त्यांचे प्रकाश शिरसाठ, अनिल शिरसाठ, बबन शिरसाठ, राजेंद्र लोंढे यांच्यासह अनेकांनी अभिनंदन केले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com