तंटामुक्तीवरून तंटा, श्रीगोंदा तालुक्यातील...

तंटामुक्तीवरून तंटा, श्रीगोंदा तालुक्यातील...

श्रीगोंदा | Shrigonda (तालुका प्रतिनिधी) :

तंटामुक्तीवरून गावात तंटे होण्याचे प्रकार अनेकदा समोर येतात. ताजा वाद श्रीगोंदा तालुक्यातील उक्कडगाव ukkadgaon येथे समोर आला आहे.

उक्कडगावमधील ग्रामपंचायत ( Gram Panchayat ) सभेत गावातील तंटामुक्ती समितीचा अध्यक्ष निवडण्यात आला. नवीन अध्यक्ष व समर्थकांनी गुलालाची उधळण करत आनंदोत्सव साजरा केला. हा आनंद साजरा करत असताना विरोधी गटांतील काहींनी त्यांना मारहाण केली. यात विद्यामान सदस्य सरपंचाला धक्काबुक्की झाली. बुधवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमाराला ही निवड झाली. त्यानंतर हा प्रकार घडला. याबाबत बेलवंडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यासाठी सरपंचासह सत्ताधारी गटाचे सदस्य पोहचले होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com