पोलिसाच्या पत्नीने ६३ दिवस झुंज देऊन करोनावर केली मात

पोलिसाच्या पत्नीने ६३ दिवस झुंज देऊन करोनावर केली मात

अहमदनगर (प्रतिनिधी) - करोनाच्या दुसर्‍या लाटेत बाधीत झालेल्या पोलीस कर्मचार्‍याच्या पत्नीने 63 दिवस करोनाशी झुंज दिली. त्यानंतर त्या ठणठणीत होऊन घरी परतल्या. नगर शहर वाहतूक शाखेतील पोलीस कर्मचारी गणपत घायतडक यांच्या पत्नी विमल यांना नुकताच डिस्चार्ज देण्यात आला.

त्यांच्या या जिद्दीला आणि डॉक्टरांच्या प्रयत्नांना सलाम करण्यासाठी पोलीस अधीक्षक मनोज पाटील स्वत: रुग्णालयात पोहचले. त्यांनी उपचार करणार्‍या डॉक्टरांचा गौरव केला. विमल घायतडक यांचा हा लढा इतरांसाठी प्रेरणादायी असल्याचे यावेळी पाटील म्हणाले. बाधा झाल्यानंतर घायतडक कुटुंबीयांना त्यांनी धीर दिला.

डॉ. बापुसाहेब कांडेकर, डॉ. विजय निकम, डॉ. राहुल हिरे यांच्याशी संपर्कात राहून उपचारासंबंधी वेळोवेळी माहिती घेतली. तब्बल 63 दिवस त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यातील 53 दिवस त्या व्हेंटीलेटरवर होत्या. आत्मविश्‍वास आणि इच्छाशक्तीच्या बळावर विमल घायतडक यांचा हा लढा यशस्वी झाला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com