पोलीस कर्मचार्‍यास मारहाण करत लुटले

आठ जणांविरूध्द दरोड्याचा गुन्हा
पोलीस कर्मचार्‍यास मारहाण करत लुटले

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

दुचाकीची धडक लागल्याच्या कारणातून पोलीस कर्मचार्‍याला मारहाण करत त्यांच्याकडील 20 हजार रूपयांची रक्कम व 10 हजार रूपये किंमतीचा मोबाईल काढून घेतला. चांदणी चौकातील महालक्ष्मी मंदिराच्या समोर सोमवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. मुख्यालयात नेमणूक असलेले अदिनाथ दिनकर शिरसाठ (रा. आष्टी जि. बीड) असे लुटमार झालेल्या पोलीस कर्मचार्‍यांचे नाव आहे.

त्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून श्याम बाबासाहेब जाधव, रोहन राजु जाधव (दोघे रा. निंबोडी ता. नगर) व अनोळखी सहा जणांविरूध्द दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान गुन्हा दाखल होताच कोतवाली पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे.

पोलीस कर्मचारी शिरसाठ हे त्यांच्या दुचाकीवर चांदणी चौकातून जात असताना महालक्ष्मी मंदिराच्या समोर दुचाकीला धक्का लागल्याच्या कारणातून त्यांचा व जाधव यांचा वाद झाला. या वादात आठ जणांनी पोलीस कर्मचारी शिरसाठ यांना मारहाण केली. त्यांच्याकडील 20 हजार रूपये व मोबाईल काढून घेतला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास कोतवाली पोलीस करीत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com