पोलीस व्हॅन बैलगाडीला धडकली

ऊस तोडणी कामगार महिला व बालक जखमी
पोलीस व्हॅन बैलगाडीला धडकली

शनीशिंगणापूर |वार्ताहर| Shani shinganapur

शनिशिंगणापूर -सोनई रोडवर (Shani shinganapur-Sonai Road) बुधवारी पहाटे शनिशिंगणापूरहून (Shani shinganapur) सोनईकडे (Sonai) येणार्‍या पोलीस व्हॅनने (Police Van) ऊस तोडीस जाणार्‍या मोकळ्या बैलगाडीला (Bullock Cart) पाठीमागून जोराची धडक (Hit) देऊन अपघात (Accident) झाल्याची घटना घडली. यामध्ये एक महिला व तान्हे बाळ जखमी (Injured) झाले असून त्यांना तात्काळ शनिशिंगणापूर (Shani shinganapur) कार्यस्थळ दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

या बाबत माहिती की, रात्री एमएच16 एन 519 या क्रमांकाची पोलीस व्हॅन (Police Van) शनिशिंगणापूरहून (Shani shinganapur) सोनईकडे (Sonai) येत असताना कमानीजवळ ऊस तोडणीसाठी चाललेल्या रिकाम्या बैलगाडीला (Bullock Cart) पाठीमाघून जोराची धडक देऊन बैलगाडीचे एक्सल तुटून गाडीची मोडतोड झाली. बैलगाडीत असलेली महिला व तिचे लहान बाळ यामध्ये जखमी (Injured) झाले. त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले. या अपघाताची नोंद करण्यात न आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Related Stories

No stories found.