पोलीस आणि विद्यार्थ्यांची लक्षवेधी देशभक्ती रॅली

पोलीस आणि विद्यार्थ्यांची लक्षवेधी देशभक्ती रॅली

तळेगाव दिघे |वार्ताहर| Talegav Dighe

संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथे स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्ताने संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार व न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य एच. आर. दिघे यांच्या नेतृत्वाखाली हाती तिरंगे झेंडे घेत पोलीस व विद्यार्थ्यांनी गावातून सवाद्य देशभक्ती रॅली काढली. यानिमित्ताने संपूर्ण परिसर देशभक्तीच्या घोषणांनी दणाणून गेला.

तळेगाव दिघे विद्यालयातून जोरदार घोषणा देत व भारत मातेचा जयजयकार करीत गावातून देशभक्ती रॅली काढण्यात आली. या देशभक्ती रॅलीत पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित ठाकरे सहित पोलीस कर्मचारी, शिक्षक व विद्यार्थी - विद्यार्थिनी सहभागी झाले होते. रॅली तळेगाव चौफुली येथे पोचल्यावर सामाजिक कार्यकर्ते नजीर शेख, मधुकर दिघे, आत्माराम जगताप सहित पदाधिकार्‍यांनी फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत केले. त्यानंतर देशभक्ती रॅली सम्यक बुद्ध विहारापर्यंत नेण्यात आली.

त्याठिकाणी पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर पुन्हा देशभक्ती रॅली तळेगाव चौफुली मार्गे विद्यालयात पोहोचली. प्रसंगी पोलीस निरीक्षक पवार यांच्याहस्ते भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित ठाकरे, पोलीस नाईक बाबा खेडकर, प्राचार्य एच. आर. दिघे, उपमुख्याध्यापक संजय दिघे, पर्यवेक्षक बी. सी. दिघे, ज्येष्ठ नागरिक पुंजा आनंद दिघे सहित मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक प्राचार्य एच. आर. दिघे यांनी केले. सूत्रसंचालन संजय दिघे यांनी केले. रॅली यशस्वीतेसाठी पोलीस नाईक बाबा खेडकर सहित पोलीस कर्मचारी व शिक्षकांनी परिश्रम घेतले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com