संगमनेरात पोलीस बंदोबस्त वाढवला: जमजम कॉलनीत स्वतंत्र राहुटी

संगमनेरात पोलीस बंदोबस्त वाढवला: जमजम कॉलनीत स्वतंत्र राहुटी

संगमनेर |शहर प्रतिनिधी| Sangmner

संगमनेर (Sangmner) शहरात काल बुधवारी बकरी ईद (Bakari Eid) सण उत्साहात साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील मुस्लिम बहुल भागात मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त (Police settlement) वाढविण्यात आला आहे. या भागात पोलीस वाहने सातत्याने घिरट्या घालत असल्याने शहरातील मुस्लिम बांधवांमधून संताप व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी हा बंदोबस्त कमी केला नाही तर बकरी ईद साजरी करणार नाही असा इशारा काही पदाधिकार्‍यांनी देताच पोलिसांनी (Police) सौम्य भूमिका घेतल्याने मुस्लिम बांधवांनी बकरी ईद साजरा न करण्याचा निर्णय मागे घेतला आहे.

संगमनेर शहरात (Sangmner City) दरवर्षी बकरी ईद उत्साहात साजरी करण्यात येते. शहरातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात येऊ नये यासाठी संवेदनशील ठिकाणावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येतो. यावर्षी शहरातील सय्यद बाबा चौक,देवी गल्ली, बौद्ध मंदिर या ठिकाणा बरोबरच इतर ठिकाणीही मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शहरातील जमजम कॉलनी मध्ये स्वतंत्र तंबू उभारण्यात आला असून याठिकाणी काही पोलीस कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याशिवाय ज्या ठिकाणी मुस्लिम बांधवांची संख्या अधिक आहे अशा ठिकाणी पोलीस वाहने सातत्याने फिरत आहे. पोलिसांचा वाढता बंदोबस्त व पोलीस वाहनांचे वाढत्या चकरा यामुळे शहरातील मुस्लिम बांधवांमधून संताप व्यक्त केला जात आहे. पोलीस बंदोबस्त त्वरित कमी करावा अशी मागणी काही मुस्लीम नेत्यांनी पोलीस अधिकार्‍यांकडे केली आहे.

दरम्यान शहरातील जमजम कॉलनी परिसरात सोमवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास पोलिसांनी पुन्हा छापा टाकून तेरा गाईंना जीवदान दिले आहे. जमजम कॉलनी परिसरात निर्दयपणे ही जनावरे बांधून ठेवलेली होती. याबाबत माहिती मिळताच पोलीस पथक जमजम कॉलनी परिसरात पोहोचले. पंचनामा करून त्यांनी या गाईंची सुटका केली. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सचिन उगले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनेकदा कारवाई करूनही या परिसरात विशेष जातीच्या जनावरांची कत्तल सुरूच असल्याने याठिकाणी स्वतंत्र तंबू उभारून खास पोलीस बंदोबस्त ठेवला असल्याचे दिसत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com