पोलिसांनी जप्त केला 9 लाख 30 हजाराचा गांजा, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

पोलिसांनी जप्त केला 9 लाख 30 हजाराचा गांजा, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

संगमनेर (प्रतिनिधी)

संगमनेर खुर्द शिवारात एका घरात विक्रीसाठी आणलेला 9 लाख 30 हजार रुपये किंमतीचा 46 किलो 425 गॅम गांजा शहर पोलिसांनी छापा टाकून जप्त केला आहे. याप्रकरणी दोघांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शुक्रवारी रात्री 11.15 वाजता करण्यात आली.

सिमा राजू पंचारिया (रा. कासारादुमाला, ता. संगमनेर), राजु चव्हाण (रा. संगमनेर) असे आरोपींचे नावे आहेत. संगमनेर खुर्द शिवारात वर्पे वस्तीवर एका घरामध्ये गांजा असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली. त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने, पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक पंकज शिंदे, पोलीस हेड कॉन्स्टेबल अमित महाजन, शिंदे, पवार, अखाडे, बर्डे या पोलिस पथकाने सदर ठिकाणी छापा टाकला. यामध्ये 9 लाख 30 हजार 660 रुपये किंमतीचा एकूण 46 किलो 425 ग्रॅम वजनाचा गांजा, 250 रुपये किमतींचा एक इलेक्ट्रानिक वजन काटा व 30 प्लॉस्टीक पिशव्या असा मुद्देमाल पोलिसांनी छापा टाकून जप्त केला. पोलिस येण्याची खबर लागल्याने दोन्ही आरोपी घटनास्थळाहून फरार झाले.

याबाबत पोलीस कॉन्स्टेबल विजय पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन आरोपींविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 516/2021 अमंली औषधे द्रव्य मनप्रभावी पदार्थ अधिनियम सन 1985 चे कलम 8 (क) सह 20 (ब)(2)(क), 29 प्रमाणे दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पंकज शिंदे करत आहे.

Related Stories

No stories found.