कत्तलीसाठी आणलेल्या सहा जनावरांची पोलिसांकडून सुटका

संगमनेर शहर पोलीस ठाण्यात एका विरुद्ध गुन्हा दाखल
कत्तलीसाठी आणलेल्या सहा जनावरांची पोलिसांकडून सुटका

संगमनेर | प्रतिनिधी | Sangamner

कत्तलीसाठी आणलेल्या 6 गोवंश जनावरांची शहर पोलिसांनी जमजम कॉलनी येथे बुधवारी रात्री छापा टाकून सुटका केली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात एका विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

शहरातील जमजम कॉलनी येथे नवाज कुरेशी (रा. भारतनगर, संगमनेर) याने कत्तल करण्याच्या उद्देशाने सहा गोवंश जनावरे आणली होती. याबाबतची खबर पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक अभय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कवडे व त्यांच्या सहकार्‍यांनी सदर ठिकाणी छापा टाकला. या छाप्यात 6 जिवंत वासरे प्रत्येकी 3500 रुपये किंमतीचे एकूण 21 हजाराची असा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला. घटनेची खबर मिळताच आरोपी नवाज कुरेशी हा फरार झाला होता. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल महादेव हांडे यांनी फिर्याद दिली. त्यानुसार शहर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 1912/2020 महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 चे सुधारीत सन 1995 चे कलम 5 (अ), 5 (क), 9(अ) तसेच प्राण्यांना निर्दयतेने वागवणेस प्रतिबंध कायदा कलम 3,11 प्रमाणे दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस नाईक लबडे करत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com