पोलीस शिपाई पदाच्या मैदानी चाचणीला 349 उमेदवार गैरहजर

दुसरा दिवस || 558 उमेदवारांनी दिली चाचणी
पोलीस भरती
पोलीस भरती

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर सुरू असलेल्या पोलीस शिपाई पदाच्या मैदानी चाचणीला दुसर्‍या दिवशी गुरूवारी 349 उमेदवार गैरहजर राहिले. एक हजार उमेदवारांना भरतीसाठी बोलविण्यात आले होते. 651 उमेदवारांनी हजेरी लावली. त्यातील दोघांनी वैयक्तीक कारणामुळे मैदानी चाचणीला नकार दिला तर 51 उमेदवार अपात्र ठरले. उर्वरित 598 उमेदवारांनी चाचणी दिली. चाचणी दरम्यान एक जण जखमी झाला आहे.

2 व 3 जानेवारीला पोलीस चालक पदाच्या 10 जागेसाठी मैदानी चाचणी घेण्यात आल्यानंतर 4 जानेवारीपासून पोलीस शिपाई पदाच्या 129 जागेसाठी मैदानी चाचणी घेण्यात येत आहे. 4 जानेवारीला 396 उमेदवार गैरहजर राहिले होते. काल 5 जानेवारीला एक हजार उमेदवारांना मैदानी चाचणीसाठी बोलवले होते.

प्रत्येक्षात 651 उमेदवार चाचणीसाठी हजर राहिले. त्यातील दोघे भरतीसाठी पात्र झाले असतानाही वैयक्तीक कारणामुळे चाचणी देण्यास नकार दिली. 51 उमेदवार अपात्र ठरले. 598 जणांनी चाचणी दिली.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com