पोलीस भरतीबाबतचे राजपत्र रद्द करा

राहुरीत निषेध मोर्चा
पोलीस भरतीबाबतचे राजपत्र रद्द करा

राहुरी |तालुका प्रतिनिधी| Rahuri

राज्य शासनाने पोलीस भरती संदर्भात 2 मार्च 2022 रोजी पारित केलेले राजपत्र रद्द करावे, या मागणीसाठी राहुरी येथील पोलीस भरती पात्र उमेदवारांनी राहुरी तहसील कार्यालय व पोलीस ठाण्यावर निषेध मोर्चा काढून मागण्यांचे निवेदन तहसीलदार एफ. आर. शेख व पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना दिले.

निवेदनात पोलीस भरती पात्र उमेदवारांनी म्हटले, राज्यशासनाने 2 मार्च 2022 रोजी एक राजपत्र जारी केले असून त्यामध्ये एनसीसी प्रमाणपत्र धारकांना एकूण गुणांमध्ये बोनस गुण देण्याचा निर्णय घेतलेला आहे. या निर्णयाला आमचा विरोध आहे. पोलीस भरतीची तयारी करणारे आम्ही 12 लाख उमेदवार असून आम्ही 5 ते 6 वर्षांपासून पोलीस भरतीची पूर्वतयारी करीत आहोत.

करोनाच्या पार्श्वभुमीवर 3 वर्षांपासून भरती झालेली नाही. त्यामुळे शासनाच्या या निर्णयामुळे खुप मोठे नुकसान होत आहे.सदरील राजपत्र भारतीय घटनेतील कलम 14, 15, 16 चे उल्लंघन करणारे आहे. त्यामुळे सदरील राजपत्र रद्द करावे, अशी मागणी करण्यात आली. यावेळी दत्तात्रय कर्डिले, श्रीकांत जाधव, समीर शेख, अमर आपटे, शरद म्हसे, शैलेश तमनर, महेश तमनर, अशोक मोहिते, महेश गावडे आदींसह पोलीस भरतीपात्र उमेदवार उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com