
अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
रविवारच्या सुट्टीनंतर सोमवारी पुन्हा एक हजार उमेदवारांना (Candidate) येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर (Police Grounds) चाचणीसाठी बोलविण्यात आले होते. त्यातील 673 उमेदवार भरतीसासाठी (Candidates Recruitment) हजर राहिले. तर 75 जणांना अपात्र ठरविण्यात आले. 598 उमेदवारांनी (Candidates) मैदानी चाचणी दिली.
नगर जिल्ह्यातील (Ahmednagar District) पोलीस शिपाई, चालक पदाच्या 139 जागेसाठी 2 जानेवारीपासून मैदानी चाचणीला सुरूवात झाली आहे. मागील आठवडाभरात ही चाचणी सुरळीत पार पडली. रविवारी मैदानी चाचणी झाली नाही. सोमवारी पहाटे पाच वाजल्यापासून पुन्हा मैदानी चाचणीला सुरूवात झाली. जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर अधीक्षक प्रशांत खैरे हे स्वत: मैदानी चाचणीसाठी हजर होते.
चाचणीसाठी एक हजार उमेदवारांना बोलविण्यात आले होते. मात्र 673 उमेदवार चाचणीसाठी हजर राहिले तर 327 उमेदवार गैरहजर राहिले. हजर पैकी 75 जणांना अपात्र ठरविण्यात आले. यामध्ये पाच जणांना कागदपत्रात, 62 जणांना उंचीत तर 8 जणांना छाती मोजणीमध्ये अपात्र ठरविण्यात आले. उर्वरित 598 उमेदवारांनी मैदानी चाचणी दिली.
दरम्यान गेल्या दोन दिवसांपासून थंडीमध्ये वाढ झाल्याने मैदानी चाचणीसाठी येणार्या उमेदवारांसह पोलीस अधिकारी, अंमलदारांचे चांगलेच हाल होत आहे. थंडी (Cold) वाढली असली तरी चाचणीच्या वेळापत्रकात कोणताही बदल करण्यात येणार नसल्याचे पोलीस अधीक्षक ओला (SP Rakesh Ola) यांनी सांगितले.