पाच दिवसांत पोलिसांनी वसूल केला 19 लाखांचा दंड

संचारबंदीत विनाकारण फिरणार्‍यांवरील कारवाई
पाच दिवसांत पोलिसांनी वसूल केला 19 लाखांचा दंड

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

करोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा पोलिसांनी कठोर उपाययोजना सुरू केल्या आहेत. विनाकारण बाहेर पडणार्‍यांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे.

जिल्ह्यात ठिकठिकाणी नाकाबंदी करून पाच दिवसांमध्ये चार हजार 601 नागरिकांवर कारवाई करून 19 लाख 38 हजार 300 रूपये दंड वसूल केला असल्याची माहिती जिल्हा विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी दिली.

14 एप्रिलच्या रात्री आठ वाजता जिल्ह्यात संचारबंदी लागू केली. पोलीस दलाने 15 एप्रिलला सकाळपासून याची प्रभावी अंमलबजावणी करण्याच सुरूवात केली. प्रत्येक पोलीस ठाण्यातील काही पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचे पथक नियुक्त करून चौकाचौकात नाकाबंदी केली जात आहे. विशेष करून नगर शहर व जिल्ह्यातील प्रमुख शहरामध्ये होणारी गर्दी लक्षात घेता पोलिसांनी त्याठिकाणी लक्ष केंद्रत केले आहे. नियमांचे उल्लघंन करणार्‍यांना 500 रूपये दंड केला जात आहे.

दोन दिवसांपासून संचारबंदीची नवीन नियमावली तयार करण्यात आली. याशिवाय पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी विनाकारण फिरणार्यांचे पोलीस ठाण्यात समुपदेश करण्याचे आदेश दिले. यामुळे जिल्हा पोलिसांनी दोन दिवसांमध्ये विनाकारण बाहेर फिरणार्या 258 नागरिकांना महाराष्ट्र पोलीस अधिनियम 69 नुसार कारवाई करून ताब्यात घेण्यात आले. त्यांना समुपदेश करून सोडून देण्यात आले. तसेच दोन दिवसांमध्ये 133 वाहन चालकांची वाहने ताब्यात घेऊन सायंकाळी सोडून देण्यात आल्याचेही निरीक्षक पाटील यांनी सांगितले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com